मुझसे दोस्ती करोगे - रेस्ट्स ईन 'पिसेस'
मुझसे दोस्ती करोगे - रेस्ट्स ईन 'पिसेस' -पूर्वार्ध कलाकार : काही उगीच हसणारे, काही अति तर काही जेमतेम अभिनयही न करणारे, काही मान डुले , काही सुट्टीवर आल्यासारखे उत्साही, काही अतिशय आनंदी ( सगळे इतर ठिकाणी उत्तम अभिनय करतात पण इथे वावच नाही.) दिग्दर्शक/निर्माते : तेच ते गोल बेड असणारे चोप्राज् संगीतकार : हेहेहेहेहेSSSSS ,हुहुहु, आआआआआ त सगळी गाणी बसवणारे पात्र : शिंदे, कुलकर्णी, कानेटकर थोडीच असणारेत ते खाली सतरंज्या पसरून झोपतात, गोलबेडवाले(गोबेवा) यांची आवडती माणसं मलहोत्रा, खन्ना, सहानी, कपूर आहेत.आपण नाही!!!!! ये दिमागमें एकबार फिट कर दिया तो आपकी पिसं काढणेकी कल्पकता वाढती है! लहानपणापासून राज(हृतिक), टीना(करीना) आणि पूजा(राणी) यांची आणि यांच्या एकुण पाच पालकांची खूपच दोस्ती असते तरी हा 'मुझसे दोस्ती करोगे?' हा प्रश्न का विचारलाय कोण जाणे, 'मुझसे लव्ह करोगे' किंवा 'मुझसे लग्न करोगे' जास्त जुळलं असतं. स्थळ :रेल्वे स्टेशन मनाली काळ: पंधरा वर्षांपूर्वीचा सीन : उगीचच हसणारी पाच मोठी, उगीचच भावूक होणारी तीन छोटी माणसं-मुलं... यात किरण कुमार- हृचाबा, ...