अनुदिनी वर्तुळ : संसार संगे बहु शिणलो मी.
अनुदिनी वर्तुळ : संसार संगे बहु शिणलो मी कोणत्याही दिवसापासून सुरू करा आणि वर्तुळामध्ये घिरट्या घालत रहा... तितकेच फिट्ट बसेल. डायरी नाव देताच 'अनुदिनी अनुतापे तापलो रामराया' आठवले. मगं संसारतापासाठी अनुदिनी अगदीच जुळते की म्हणून अनुदिनी केले. १. किराणा घराणा / घरी आणा. कुठलाही दिवसं काय हे शेंगदाणे का नाही सांगितले ...मी आणले नसते का, बघं आता डब्यात वाटीभर राहिलेत फक्त ! मी तुला पालक तरी कुठे आणायला सांगितलं होता तो आणलासं नं मनाने आता दोन पिशव्यांचा काय पालक फेस्टिव्हल करू.....! का नाही आणले शेंगदाणे , नाही तरी तूच येताजाता भरतोस, तुला लक्षात यायला होते मगं. ********** कुठलाही इतर दिवस (स्थळः मी बाथरूम स्वच्छ करतं आहे. यादी whatsapp केली आहे. ) आई S S , बाबाचा मेसेज आहे की गूळ , हिंग , हिरव्या मिरच्या नाही मिळताहेत अलिबाबा या दुकानात... आता अलिबाबात का गेला असेल हा मी हिमालयात जा म्हणून सांगूनही का करतो असं... आईss , बाबा विचारतोयं काय करू , आई s s... मुलं तर स्वगतही बोलू देत नाहीत. काही करं ...जा म्हणावं ... मी टाइप करू ? हो करं, हाय बाबा , This is Dada , आई says , काही कर...