पोस्ट्स

विनोदी लेखन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एक 'हकनाक' विवाह

इमेज
  ---------------- विवाह नेटफ्लिक्स वर आलेला आहे, बघायचा असल्यास ....का पण?! तरीही मी बघतेय. कारण घरी कोणी नाही. रामायणातल्यासारखे संगीत सुरू झाले आहे, इंग्रजी वर्णनात  Set up for an arranged marriage, a young couple enjoys an old-fashioned courtship, until an accident days before their wedding tests their nascent love.  ह्या nascent चा अर्थ मी गुगलणार नाही , सरळ 'नाशवंत' असा घेणार आहे. रेटिंग १४ व जॉन्रा 'फिअर' आहे. यावरुन तुम्हाला खात्री पटेल की मी निर्भय असून कधीतरी पौगंडावस्थेत असते. बाबूजी (आलोकनाथ) जे 'बाऊजी' म्हणून संबोधल्या जातात, हे नावाला जागून स्वगतात नेहेमी बाऊ झाल्यासारखे बोलत असतात. तरूणपणी यांना खऱ्याखऱ्या केसांचा टोप होता, (पाच मिनिटांत येणाऱ्या वर्तमानात) वय झाल्याने तो काढून ठेवला. हे सतत आपलं मुलगी म्हणजे पराया धन ,त्यांचं विश्वच वेगळं, पराया घराच्या मालकीणी , इथे छोट्या कळ्या- सासरी जगत्जननी असं 'रावणचहाकर' बाईंचं भाषणटाईप दुकानातली हिशेबाची लाल चोपडी वाटावी अशा वहीत लिहीत बसलेयतं. (ह्यात चंडी, काली, दूर्गा, महिषासुरमर्दिनी या अवस्थां

फराळाचा PTSD कसा द्यायचा?

इमेज
एखाद्या धक्कादायक घटनेनंतर मनात त्या अनुभवाची एक भीती बसते, त्याला PTSD (post traumatic stress disorder) म्हणतात. ---------------- आपण केलेल्या गोष्टी/चांगलेचुंगले / मेहनतीने केलेल्या पाककृती विसरून जाणारा किंवा 'रिप्लेस मेमरी' असणाऱ्या नवरा असलेल्या मैत्रिणींना समर्पित....  एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला. तेव्हापासूनच काही आयडिया हाताशी ठेवल्यात... फक्त मुलींसाठी.  फराळाचा PTSD कसा द्यायचा?    1. कच्च्या मालासाठी वेगवेगळ्या दुकानात पळवायचं, तरी उणिवा काढून किरकिर करायची. उदा. रवा/पोहे जाड/ पातळ/ बारीक, खोबरं- शेंगदाणे खवट. 2. शंभर मेसेज-फोन करून जास्तीत जास्त महत्त्व अधोरेखित करायचं. सारखं 'कुठपर्यंत झालं' विचारत रहायचं . किराणा खरेदीत झालेल्या चुकांवर खूप हताश होऊन सुस्कारे सोडत रहायचं. 3. आठ दिवस आधीपासूनच शॉर्टकट स्वैपाक करायचा, का विचारलं तर मोठ्याने 'फ रा ळ' एवढंच म्हणायचं. फराळाच्या रुखवतापैकी काहीनंकाही डायनिंग टेबलवर मांडून ठेवायचं व वातावरणनिर्मिती करायची. उदा.

टेस्ला गं बाई टेस्ला

इमेज
  टेस्ला गं बाई टेस्ला आमच्याकडे एक बरीच जुनी मळकट कार आणि एक थोडी जुनी बेढब वॅन आहे. या दोन्हीही मी नियमित चालवत असते. पण दोन तीन वर्षात आमच्या नेबरहूडात हळूहळू सगळ्या टेस्ला दिसायला लागल्यात.   किंवा साधुसंतांना सगळीकडे जसा ईश्वर दिसतो तशा मला ह्याच दिसत असतील. मागच्या वर्षीपासून तर ड्रायव्हिंग करताना दर तीन मिनिटाला एक टेस्ला बाजूने सुळकन निघून ही जाते. आणि मला आपोआपच हीन भावना येते. कसं ते सांगायला '3 ईडियट्स' मधल्या रँचो सारखा डेमो देते. त्याशिवाय काही ही हीन भावना तुमच्यापर्यंत पोचणार नाही.         शेजारशेजारच्या दोन थेटरात दोन सिनेमे लागलेत , त्याचे पोस्टर बाहेरच्या भिंतीवर लावलेय. एकात 'गहराईयां'ची दीपिका पडूकोण तर दुसऱ्यात कुठल्याही सिनेमाची काकुळतीला आलेली निरूपा रॉय आहे. कल्पना करा, निरूपांच्या सिनेमाचे तिकीट पन्नास रुपये व दीपिकाच्या सिनेमाचे हजार आहे, आणि तुमच्याकडे पंचवीस रूपये आहेत तर तुम्हाला सिनेमाला न जाताही हीन भावना येईल. शिवाय घरी येऊन टिव्ही बघावा तर एक-दोन वाहिन्यांवर 'आमची माती-आमची माणसं' लागलेलं असंल, तर जे काय मनात तयार होईल. ती हीच

मुझसे दोस्ती करोगे - रेस्ट्स ईन 'पिसेस'

इमेज
  मुझसे दोस्ती करोगे - रेस्ट्स ईन 'पिसेस' -पूर्वार्ध कलाकार  : काही उगीच हसणारे, काही अति तर काही जेमतेम अभिनयही न करणारे, काही मान डुले , काही सुट्टीवर आल्यासारखे उत्साही, काही अतिशय आनंदी ( सगळे इतर ठिकाणी उत्तम अभिनय करतात पण इथे वावच नाही.) दिग्दर्शक/निर्माते :  तेच ते गोल बेड असणारे चोप्राज् संगीतकार : हेहेहेहेहेSSSSS ,हुहुहु, आआआआआ त सगळी गाणी बसवणारे पात्र : शिंदे, कुलकर्णी, कानेटकर थोडीच असणारेत ते खाली सतरंज्या पसरून झोपतात, गोलबेडवाले(गोबेवा) यांची आवडती माणसं मलहोत्रा, खन्ना, सहानी, कपूर आहेत.आपण नाही!!!!! ये दिमागमें एकबार फिट कर दिया तो आपकी पिसं काढणेकी कल्पकता वाढती है! लहानपणापासून राज(हृतिक), टीना(करीना) आणि पूजा(राणी) यांची आणि यांच्या एकुण पाच पालकांची खूपच दोस्ती असते तरी हा 'मुझसे दोस्ती करोगे?' हा प्रश्न का विचारलाय कोण जाणे, 'मुझसे लव्ह करोगे' किंवा 'मुझसे लग्न करोगे' जास्त जुळलं असतं. स्थळ  :रेल्वे स्टेशन मनाली काळ: पंधरा वर्षांपूर्वीचा सीन : उगीचच हसणारी पाच मोठी, उगीचच भावूक होणारी तीन छोटी माणसं-मुलं... यात किरण कुमार- हृचाबा,

अनुदिनी वर्तुळ : संसार संगे बहु शिणलो मी.

इमेज
  अनुदिनी वर्तुळ : संसार संगे बहु शिणलो मी कोणत्याही दिवसापासून सुरू करा आणि वर्तुळामध्ये घिरट्या घालत रहा... तितकेच फिट्ट बसेल. डायरी नाव देताच 'अनुदिनी अनुतापे तापलो रामराया' आठवले. मगं संसारतापासाठी अनुदिनी अगदीच जुळते की म्हणून अनुदिनी केले. १. किराणा घराणा / घरी आणा. कुठलाही दिवसं काय हे शेंगदाणे का नाही सांगितले ...मी आणले नसते का, बघं आता डब्यात वाटीभर राहिलेत फक्त ! मी तुला पालक तरी कुठे आणायला सांगितलं होता तो आणलासं नं मनाने आता दोन पिशव्यांचा काय पालक फेस्टिव्हल करू.....! का नाही आणले शेंगदाणे , नाही तरी तूच येताजाता भरतोस, तुला लक्षात यायला होते मगं. ********** कुठलाही इतर दिवस (स्थळः मी बाथरूम स्वच्छ करतं आहे. यादी whatsapp केली आहे. ) आई S S , बाबाचा मेसेज आहे की गूळ , हिंग , हिरव्या मिरच्या नाही मिळताहेत अलिबाबा या दुकानात... आता अलिबाबात का गेला असेल हा मी हिमालयात जा म्हणून सांगूनही का करतो असं... आईss , बाबा विचारतोयं काय करू , आई s s... मुलं तर स्वगतही बोलू देत नाहीत. काही करं ...जा म्हणावं ... मी टाइप करू ? हो करं, हाय बाबा , This is Dada , आई says , काही कर