पोस्ट्स

पाककृती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आप्पेपात्रातली कोफ्ता करी- आफ्ता करी

इमेज
  पूर्वतयारीचा वेळ:  ३० मिनिटे    प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४५ मिनिटे लागणारे जिन्नस:  कोफ्त्यांसाठी : किसलेले पनीर एक वाटी , साधारण पाऊन वाटी चितळे गुलाबजामचे कोरडे मिक्स, किसलेले गाजर अर्धी वाटी, दोन बटाटे उकडून किसून, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, पाच काजू- अर्धबोबडे ,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर , मीठ, चमचाभर तिखट, चमचाभर गरम मसाला , दोन चिमूट कसूरी मेथी. परतण्यासाठी तेल. पत्ताकोबी घरात असूनही लक्षात आले नाही घालायचे. करीसाठी: दोन कांदे, चार टोमॅटो, प्रत्येकी एकएक चमचा आलेलसूण पेस्ट, चमचाभर तिखट,१- २ चमचे गरम मसाला / शाही पनीर मसाला,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर, मीठ, चिमूटभर हळद, दोन तमालपत्रं, अर्धा कप दूध ,अर्धा कप हाफ अँड हाफ. जी अर्धी मलाई असते, त्यातल्यात्यात कमी स्निग्धांश असलेली मलई असते. क्रमवार पाककृती:  कोफ्त्यांसाठी वर दिलेले सगळे घटक एका मोठ्या बोलमधे गोळा करा. हलक्या हाताने मिसळून व मळून गोळे करून घ्या. 'हलक्या हाताने' लक्षात ठेवा कारण हे बेसनाचे लाडू नव्हेत. दाबून मळलेले कोफ्ते गच्च होतात व पोटांत (त्यांच्या) कच्चे रहातात....

व्हेज ग्रीन थाई करी

इमेज
  पूर्वतयारीचा वेळ:  ३० मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १ तास लागणारे जिन्नस:  करीच्या वाटणासाठी : २ पेरं ओली हळद, ४ पेरं गलांगल(थाई आले),दोन काड्या लेमनग्रास, ५-६ हिरव्यागार मिरच्या, प्रत्येकी चमचाभर पांढरे मिरे, जिरे, धने, ७-८ कोथिंबीरीच्या काड्या, २-३ सांबारचे कांदे, ६-७ पाकळ्या लसूण, एका पूर्ण केफिर लाईमची सालं (पांढरा भाग न येऊ देता). बाकीचे : १ लिटर नारळाचे दूध, मशरूम, मध्यम आकारात चिरलेली- प्रत्येकी अर्धी वाटी लाल-हिरवी शिमला मिर्ची , ब्रॉकोलीचे तुरे, गाजराच्या चकत्या, बाळ कणसं,थाई बेझिलची ५-६ पाने क्रमवार पाककृती:  क्रमवार पाककृती * १. वाटणाचे घटक मिक्सर मधून घूरकावून घ्या. निन्जा बिनपाण्याचे करत नाही म्हणाले, म्हणून अर्धीवाटी पाणी घातले. त्यात माझी लेमन ग्रास जून/निबर निघाली, त्यामुळे थोडे जास्तच फिरवले. आर्टिफिशय इंटलेक्टचे निन्जा लईच आगाव हाय, चटणी झाली समजून मनानंच कुटणं थांबवतं. त्याला खवट सासू नव्या सुनेला ज्या प्रेमाने समजावते तसं किंवा 'मोटा शाणा झाला का बे' म्हंणत, ओव्हरराईड करत ओल्या नारळाच्या चटणीसारखी चटणी करून घेतली. * संज्याेतनी गलांग...

पालकाची पातळ भाजी

इमेज
पालकाची पातळ भाजी   पूर्वतयारीचा वेळ:  २० मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४० मिनिटे साहित्य : पालक बारीक चिरून तीन ओंजळ , २ वाटी शिजवलेली तूर डाळ, चणा डाळ १ चमचा , भरपूर लसूण तुकडे करून, मुठभर शेंगदाणे, दोन तीन चमचे बेसन/डाळीचे पीठ, चिंचेचा कोळ १ चमचा (मी तयार घातला, तो जास्त आंबट असतो. तुम्ही भिजवून केला तर थोडा जास्त लागेल आणि गरम पाण्यात भिजवले तर लवकर होतो ) एक चमचा गूळ, एक चमचा काळा मसाला, तिखट , मीठ, जिरे, मोहरी ,दोन तीन सुक्या लाल मिरच्यांचे मोठे तुकडे. क्रमवार पाककृती:  तेलाची फोडणी(मोहरी जिरे) करून थोडा लसूण, लाल मिरच्या , व चणा डाळ घालून परतून घ्यावे. मग पालक परतून घ्यावा, एक वाफ येऊन थोडा होतो , हळद घालावी , डाळ पाणी घालून पातळ करून घालावी, एक उकळी आली की बेसन अर्धी वाटी पाण्यात नीट मिसळून ते ह्यात घालावे , व थोडे पाणी घालून चिंच, गूळ , काळा मसाला, व मीठ घालून झाकण लावून भरपूर शिजवावे, gas बंद करावा. मगं पुन्हा भरपूर तेलाची वेगळी फोडणी करावी त्यात मोहरी, लसणाचे तुकडे, शेंगदाणे, कढीपत्ता, घालून खुटखुटीत झाले की तिखट घालून थोडे परतून gas बंद करावा...

अवाकॅडो सँडविच , तिरंगी पचडी , अजिलिओ ए ओलिओ.

इमेज
  हे तिन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत पण मी एकाच धाग्यात लिहिले आहेत. अवाकॅडो सँडविच साहित्य .. १ पिकलेले अवाकॅडो , २ हिरव्या मिरच्या, १ लिंबू, वाटीभर चिरलेली कोथिंबीर , २ लसणाच्या पाकळ्या, चमचाभर मध /साखर , थोडे मीठ, १ टमाटा, अर्धा कांदा (साधारण अर्धी वाटीभर चिरून) , मीठ चवीनुसार / अर्धा चमचा, चीज स्लाइस, बटर. कृती... एवोकॅडो साल व बी काढून मिक्सर मध्ये घाला. त्यात लिंबू पिळून, चमचाभर मध/साखर , मीठ व हिरव्या मिरच्या (फोटो मध्ये नाहीत पण टाकल्यात ) आणि लसूण घालून व्यवस्थित फिरवून एकजीव करून घ्या. आता या स्टेपला ही रेसिपी डीपची झाली आहे. पण डीपने पोट नाही भरत म्हणून सँडविच करू   ! या मिश्रणात आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटा, कोथिंबीर घालून हलवून घ्या. मीठ कमी वाटत असेल तर तेही टाकून घ्या. हे झाले स्प्रेड तयार. आता दोन ब्रेड मध्ये लावून हवे असल्यास चीज स्लाइस वर ठेऊन बटर वर नीट भाजून घ्यावे. माहितीचा स्रोत...भाची देवकी   . ******************************************************** तिरंगी पचडी हा एक कोशिंबीरीचाच प्रकार आहे. पण मी वाफवून घेतली आहे. मूळ रे...

किन्वाची खिचडी (साबुदाण्यासारखी)

इमेज
  किन्वाची खिचडी (साबुदाण्यासारखी) पूर्वतयारीचा वेळ:  ३० मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  दोन ते अडीच वाटी कच्चा किन्वा , हिरव्या मिरच्या , आलं , तूप /तेल किंवा दोन्ही , जिरे , उकडलेल्या( दोन) बटाट्यांच्या फोडी , दाण्याचा कूट(पाऊण वाटी) , शेंगदाणे, मीठ, साखर. *आलं व हिरव्या मिरच्या भरपूर कारण किन्वाला स्वतःची अशी चव नाही. क्रमवार पाककृती:  **वि. सू. बऱ्याच माबोकर मैत्रिणींनी (तीन) ही पाककृती मागितली त्यापैकी दोघींना विपु सुद्धा केला. आता एकीसाठीच हा धागा काढतेयं असं होऊ देऊ नका.  सकाळी भाज्यांचे सूप व रात्री फ्राइज खाणाऱ्या कधीकधी 'हेल्थ कॉन्शस' मित्रांनो घ्या.  १. मी एका मोठ्या बोलमध्ये किन्वा घेतला. २. त्याला दोन तीनदा पाणी बदलून व्यवस्थित धुतले. ३. वर थोडं पाणी घातलं. ४. मायक्रोवेव्हमध्ये झाकण न ठेवता दोन दोन मिनिटे असं करतं तीन चार वेळा मधून मधून 'आइस एज' बघत बघत मधून थोडं थोडं पाणी घालत शेवटी किंचित तूप टाकून फिरवले. सगळं लक्ष टिव्हीकडे होतं. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मायक्रो काय ते बघा. (कुकरमध्ये मी कधी केलं नाही.) ५.म...

काऱ्हळाची चटणी

इमेज
  काऱ्हळाची चटणी तुम्ही कदाचित याला काऱ्हळे म्हणत असाल , मग ही काऱ्हळ्याची चटणी होईल. साहित्य दोन मध्यम वाटी काऱ्हळं, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, चार चमचे तिखट, दोन चमचे जिरे, एक चमचा मीठ, थोडे तेल. भाजण्यासाठी टिप... सगळ्यात आधी काऱ्हळं भाजून घ्या. "मंद आचेवर " हे फारच महत्त्वाचे आहे कारण हे काळे असल्याने कळत नाही रंग बदललेला , मग आपण जास्त भाजतो आणि चटणी कडू होते. स्वानुभव   . चक्क फेकून द्यावे लागले एकदा मला मगं कानाला खडा लावला. काऱ्हळाची चव अगदी nutty/earthy का काय असते तर तिची तीव्रता थोडी कमी करून तरीही ती appreciate करण्यासाठी थोडे भाजणे आवश्यक आहे. एकदा दोन वाटी काऱ्हळं वाया घालवल्यानंतर माझा आत्मविश्वास गेला मगं तर मी microwave मध्येच ताटात पसरवून भाजले तरी चांगली चटणी झाली. यामुळे गेलेला आत्मविश्वास परत आला तर आता मी पुन्हा gas वर कढईत भाजते आहे .  पाककृती १. काऱ्हळ भाजून घेणे. पटकन भाजतात आणि मूळचा काळा रंग चमकदार दिसायला लागतो. चुट् चुट् आवाजही येतो लगेचच आच बंद करा. व कढई उचलून थंड ठिकाणी ठेवा. (यात आताच जिरे ही टाकू शकता मी विसरते नेहमीच !) २. थंड झाल्या...