पोस्ट्स

हिंदी चित्रपट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

8am Metro - गुलजार यांच्या कविता व दोघांची गोष्ट

इमेज
  <em>मी जर सोनमासळीचे शरीर घेवून या तलावाच्या तळाशी लपून राहीले असते तेव्हा तू चंद्रबिंबासारखा या पाण्यावर तरंगत आला असतास आणि माझ्या काळोख्या घरात चांदणे पसरवले असतेस तरंगत म्हणालाही असतास या एकाकी तळ्यात , 'तुझ्यावरही कुणी प्रेम केले असते'. मग मी किनाऱ्यावर येऊन तुझ्याशी मैत्री केली असती, तुझ्या सोनमासळीने तुझा एकाकीपणा दूर केला असता. या कल्पनेने तुला 'सुकून' मिळाला असता, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती</em> 'एट एम मेट्रो' सिनेमातली ही गुलजार यांची कविता. "एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं बन सकते" या हिंदी चित्रपटातील सर्व व्याख्यांना छेद देत कुठेतरी दूर नेऊन ठेवणारी थोडी परकी पण बरीचशी आपली वाटणारी दोन माणसांची कथा. ती कधीही स्त्रीपुरुषांची होत नाही, ना कधी 'जेन्डरलेस' स्नेहाचा बटबटीत दिखावा करते. ती शेवटपर्यंत दोन माणसांचीच राहते. तुम्हाला जे हवे ते तुम्ही घ्या, नको असेल तर नका घेऊ. इतके कंफर्टेबल व्यक्त..!  साधीसरळ आत्मविश्वास कमी असणारी संवेदनशील गृहिणी इरा व टागोर, चेकॉव्ह, हर...

एक 'हकनाक' विवाह

इमेज
  ---------------- विवाह नेटफ्लिक्स वर आलेला आहे, बघायचा असल्यास ....का पण?! तरीही मी बघतेय. कारण घरी कोणी नाही. रामायणातल्यासारखे संगीत सुरू झाले आहे, इंग्रजी वर्णनात  Set up for an arranged marriage, a young couple enjoys an old-fashioned courtship, until an accident days before their wedding tests their nascent love.  ह्या nascent चा अर्थ मी गुगलणार नाही , सरळ 'नाशवंत' असा घेणार आहे. रेटिंग १४ व जॉन्रा 'फिअर' आहे. यावरुन तुम्हाला खात्री पटेल की मी निर्भय असून कधीतरी पौगंडावस्थेत असते. बाबूजी (आलोकनाथ) जे 'बाऊजी' म्हणून संबोधल्या जातात, हे नावाला जागून स्वगतात नेहेमी बाऊ झाल्यासारखे बोलत असतात. तरूणपणी यांना खऱ्याखऱ्या केसांचा टोप होता, (पाच मिनिटांत येणाऱ्या वर्तमानात) वय झाल्याने तो काढून ठेवला. हे सतत आपलं मुलगी म्हणजे पराया धन ,त्यांचं विश्वच वेगळं, पराया घराच्या मालकीणी , इथे छोट्या कळ्या- सासरी जगत्जननी असं 'रावणचहाकर' बाईंचं भाषणटाईप दुकानातली हिशेबाची लाल चोपडी वाटावी अशा वहीत लिहीत बसलेयतं. (ह्यात चंडी, काली, दूर्गा, महिषासुरमर्दिनी या अवस्थां...

दो पैसे की धूप चाराने की बारीश

इमेज
  पैसे की धूप चाराने की बारीश नेटफ्लिक्स दिग्दर्शक -दीप्ती नवल मनिषा कोईराला, रजित कपूर (तो कॅरिस्मॅटिक रजत कपूर नाही, व्योमकेश बक्शी मधला साधासरळ) अतिशय सुंदर चित्रपट आहे. जगावेगळ्या कथानकाला जाणून घ्यायची आवड असेल तर नक्की बघा. मला फारच आवडला. दीप्ती विदुषीच वाटत आली आहे कायम. मला तिनी काहीही केलं तरी आवडतंच. चित्रपटसृष्टीत बस्तान बसवण्यासाठी संघर्ष करणारा एक मनस्वी गीतकार, जो समलिंगी आहे. त्यामुळे एक वेगळा वैयक्तिक संघर्षही तो समांतरपणे करत आहे. मनिषाच्या नवऱ्याने मूल अपंग आहे, हे लक्षात आल्यावर जबाबदारी झटकून काढता पाय घेतला आहे. तिला उत्पन्नाचा कुठलाही मार्ग उरला नसल्याने ती वेश्याव्यवसाय करते आहे. पण मूल अपंग आणि हिचेही वय वाढत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणून तिचे उत्पन्न कमी होते आहे. हे दोघेही आपापल्या आयुष्यात दिशाहीन आहेत. योगायोगाने ह्यांची भेट होते व नाईलाजाने एकत्र रहायला लागतात, कारण तो गे असल्याने त्याला घर भाड्याने मिळणं कठीण होतं आणि परिस्थितीही विशेष नाही. मग तो तिच्या अपंग मुलाला सांभाळायला लागतो. त्याला खाऊपिऊ घालतो अगदी मजेदार मावशी सारखी माया करतो. त्यांचं नात...

डंकी

इमेज
  डंकी आवडला नाही. शाहरुख आवडतो तरीही सिनेमा नाहीच आवडला. त्याच्यातल्या अढळ स्टारपदाच्या लालसेने त्याच्यातल्या अभिनेत्याला तुडवून मागे टाकले आहे. सर्व सिनेमा, अभिनय, ते गाव, पटकथा सगळं बेगडी वाटत होतं. बोमन इराणी मला ओव्हररेटेड वाटतो, रिजिड देहबोली आणि मर्यादित हावभाव दाखवणारा चेहरा आहे. सूक्ष्म ॲटिट्यूड दिसत राहतो. पण इथे सगळे त्याच लेव्हलला उतरले आहेत. तापसी त्यातल्या त्यात प्रयत्न करत होती. सपोर्टिंग स्टाफ मोठ्या स्क्रीनवर काम मिळाले याच समाधानात 'ओव्हर' करत होता. शाहरुख अगदी भावनिक क्षणी सुद्धा उत्तेजीत वाटत होता, म्हणजे भांगड्याची एनर्जी दुःखद क्षणी दाखवत होता. त्याचे खांदे, हात ,पाय, चेहरा सगळं भांगड्याच्या तयारीत वाटलं. त्याने गमावलेला अभिनय एनर्जीने भरून काढायचा प्रयत्न केला आहे पण तेच नको होतं. अभिनयाची रेंज पूर्वीसारखी राहिली नाही फक्त हाईट आहे. आताच्या बेगडीपणात तो मोल्ड करतोय स्वतःला, जी त्याची USP नाही. सनबर्न झालेल्या स्किनवर डिस्टेंपर फासल्यासारखा दिसतोय ते वेगळंच. फारच फेक वाटला सिनेमा, वाईट एवढ्यासाठी वाटतं की त्यांनी खरं वाटावं असे प्रयत्न केलेत असं सुद्धा वाट...

ॲनिमल

इमेज
  मला अजिबात आवडला नाही ॲनिमल. हिंसेच्या बाबतीत मी असहिष्णू नाही, मला 'मिर्झापूर' आवडली होती. त्यात हिंसेला त्या पात्राच्या क्रौर्याचा/ विकृतीचा किंवा प्रतिशोधाचा व्यवस्थित आधार होता. ॲनिमलमध्ये मात्र 'इतका रक्तपात दाखवू की तुम्ही भंजाळून आवडला म्हणाल' असा अप्रोच आहे. इथल्या विकृतीला कसलाच आधार नाही किंवा कसली सुसूत्रताही नाही. कसल्याच भावभावनांचे स्पष्टीकरण दिले नाही. रणबीरच्याच नाही तर अनिल कपूरच्याही नाही. काहीही कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही. कुणीकडूनही चिळकांडी उडवायला निमित्त. बंदूक असतानाही कुऱ्हाडीनं मारताना/ गळा आवळून मारताना दाखवण्याचा काय हेतू होता. एकही विनोद दर्जेदार नाही, थोडंही हसू येत नाही. चीप तर आहेतच पण 'आऊट ऑफ प्लेस'ही आहेत. घरातील शेकडो लोकांसमोर डॉक्टर 'सेक्स लाईफ' विषयी कंसल्ट करते आणि हा मूर्खासारखा तिची उलटतपासणी करतो. सत्यनारायणाची पूजा आहे की काय. गाणीही बंडल आहेत, चड्डीचे 'हस्तांतरण' करून 'मराठी पंजाबी भाई भाई' दाखवणं किती बावळटपणाचं आहे. मला विकृतीपेक्षाही या सर्व मूर्खपणाची जास्त शिसारी आली. जरा इंटेलिजन्ट विकृती...