पोस्ट्स

पुस्तक परिचय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सच कहुं तो- नीना गुप्ता : थोडा परिचय -थोडं चिंतन

इमेज
  ह्या पुस्तकाविषयी ऐकलं होतं, पण वाचनाच्या बाबतीत अचानकच रस वाटणं बंद झाल्याने हे आणि इतरही बरीच पुस्तकं मागेमागे पडत गेली. एकदातर ह्या पुस्तकाची १०० पानं पंचेचाळीस मिनिटात वाचली, 'पानं मोजणं' कधी करेन वाटले नव्हते. पण मी त्या अ-वाचकाच्या गर्तेतून बाहेर पडतेयं हेही थोडके नाही. तरीही पूर्वीचा 'राक्षस' परत हवायं. जयश्री गडकरचे 'अशी मी जयश्री' सोडून मी याआधी कुठलेही सिने किंवा नाट्यसृष्टीतल्या लोकांचे आत्मचरित्र वाचलेले नव्हते. दादा कोंडकेचे 'एकटा जीव' आईने सुचवले होते, तेव्हा 'ती तूच आहेस का, जिने मला दादा कोंडकेचा एकही सिनेमा बघू दिला नाही' झाले होते !! एवढंच नाही तर तिने 'फडके - अर्नाळकर' पण गाठोड्यात घालून भिंतीतल्या कपाटात वर टाकून दिले होते. हे सांगायचं कारण की नीनाच्या आईने पण 'लडकी बिगड़ जायेगी' या भीतीपोटी अपार कष्टं घेतले होते. ती तिचं 'बिघडली', आपण आपलं बिघडू.  नीनाच्या प्रेमप्रकरणांमधल्या संभाव्य 'रसाळ' तपशीलामुळे ते पुस्तक हातोहात खपलेही/खपतंही असेल. तिने व्हिवियनची, मसाबाची, सर्वांचीच प्रायव्हसी जपण्यास

मुक्काम शांतिनिकेतन: पु.ल.देशपांडे

इमेज
        मी पुलंच्या पुस्तकांची पारायणं केलेली आहेत, तुम्हीही केलेली असतील. जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ , हे तर पाठ होते. नंतर एक शून्य मी , रेडिओवरील भाषणे व श्रुतिका, एका कोळियाने हेही दोनदोनदा तरी वाचलेले होते, पण साधारण दहा वर्षांपूर्वी मी त्यांच्या लेखनातून बाहेर पडले , आऊटग्रो झाले, माहिती नाही काय पण काही तरी झाले खरे !!!           मग हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं , का घेतलं , रवींद्रनाथांच्या आकर्षणातून घेतलं की पुलच्या की दोहोंच्या.... असो.  हे पुस्तक मला खूप आवडलं. आता लक्षात आलंय की पुलच्या विनोदी लेखनापेक्षा मला पुलंचे असे वैचारीक लेखन अधिक भावते, जवळचे वाटते कारण ते intrigue करते. विशेष म्हणजे हे लेखन कालातीत का काय म्हणावे तसे वाटले. तसं म्हणावं तर हे पुस्तकं ही एक दैनंदिनी आहे. पुलंनी रवींद्रनाथांच्या जबर ओढीने, संगीताविषयीच्या ध्यासाने, बंगाली भाषेबद्दलच्या आत्मियतेने व एकुणच Bengali Renaissance बद्दल थोडे फार जाणून घेण्याच्या आस्थेने, एक महिना शांतिनिकेतन येथे वास्तव्य केले होते.     बंगाली भाषा व रवीन्द्रनाथांचे काव्य यांच्या ओढीचा वारसा त्य