कोकोनट ट्रेल्स -२ 🥥🌴🌴

कोकोनटचे इन्स्टापेज कोकोनटचे इन्स्टापेज आमचा कोकोनट (कसाबसा)पास झाला. परिक्षेच्या दिवशी टाय व डिग्रीची हॅट घालून अभ्यास न करता गेलो होतो. सगळा भर टिपटॉप रहाण्यावर होता. मला निळा रंग आवडतो म्हणून मी त्याचं सगळं निळ्या रंगाचं घेते. आधी काळं हार्नेस होते, एकदम रुबाबदार ऑफिसर सारखा दिसायचा. वॉकला जाताना त्याला आम्ही FBI चं वेस्ट घाला म्हणायचो. ते लहान झाल्यावर हे निळं आणलं, आता ॲस्ट्रॉनॉटचं वेस्ट घाला म्हणतो. कॉलरही निळी आहे त्यावर त्याचं नाव आणि माझा फोन नंबर कस्टम केला आहे. मी भाजी चिरताना,इतकी उत्सुकता आहे. मला बघत खाऊच्या आशेने स्वयंपाकघरात. मी टाचा दुखू नयेत म्हणून आणलेली मॅट त्याला वाटते त्याला आरामात बसून मला बघता यावे व खायला मागावे याच्यासाठी आणली आहे. तपकिरी डोळ्यांचे संमोहन..! आम्हाला कंटाळला की कोकोनट देवघरासमोर जाऊन झोपी जातो. आम्ही खूप कलकलाट केला की हे असं आमचं बाळ ताईच्या भावलीला घाबरून पळत क्रेटमधे जाऊन बसलं. भावलीला हाताने नाचवून मी 'हॅलो कोकोनट ' म्हटलं की फारच घाबरगुंडी उडाली. काल राखी पौर्णिमा साजरी केली तेव्हा कोकोनटलाही ओवाळलं. त्याला औक्षण ...