Can you hear the music!
वैधानिक इशारा* जड-आध्यात्मिक लेख आहे, परत फिरा. डेकार्टच्या मते आपण विचार करतो म्हणून आपण 'असतो', I think therefore I am ! पाश्चिमात्य तत्त्वज्ञान कुठेतरी विचारांतच अडकून पडले आणि पौर्वात्य त्यामानाने कितीतरी पुढे 'निर्विचारी' अवस्थेत गेले. अद्वैतवाद हा त्याहीपुढे जाऊन आत्म्याचे खरे रूप दाखवतो. त्यामुळे ज्यांना खऱ्याखुऱ्या अध्यात्माची ओळख हवी आहे, त्यांना जगभर फिरून पुन्हा घरी परतावेच लागते. पण फिरावंही लागतं , कारण इतर संस्कृतीतील अध्यात्मिक गूढ हे आपल्या आयुष्यातही टप्प्यांसारखे येतच असते. एका भटक्यानी एकदा बुद्धाला थेट विचारलं , 'परमात्मा' अशी काही गोष्ट खरोखरच अस्तित्वात असते का ? बुद्धाने उत्तरादाखल मौन धारण केले. कारण कुठलंही उत्तर दिलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्रज्ञेच्या प्रांतात येणाऱ्या गोष्टी ह्या त्या अनुभूती दरम्यानच अस्तित्वात असतात. जेव्हा आपण त्याला काही तरी नाव देत असतो ती अनुभूती नष्ट होत असते. जरा-व्याधी-मृत्यू यांच्यापासून अलिप्त असणाऱ्या तेजस्वी परमतत्त्वाला बौद्धप्रणालीत 'तथागत-गर्भ' असेही म्हणतात. एखादी गोष्ट गूढ असली की ...