The help
The Help (@Prime) Emma Stone, Viola Davis, Octavia Spencer. मायबोलीवरील लिंक हा चित्रपट मीही काल पाहिला. चित्रपटाची कथा १९६५ च्या काळात मिसिसिपी राज्यातील छोट्याशा गावात घडते. हा काळ मानवी हक्क संरक्षणाच्या अविरत प्रवासातील जागृती होण्याचे छोटेसे पाऊल म्हणता येईल असा होता. अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांची गुलामगिरीतून 'औपचारिक' सुटका होऊन शतक उलटून गेले होते तरी मानसिकता आणि वंशभेद तितकाच ठळक आणि क्रूर वाटावा असाच होता. त्यातल्या दोन घरगुती कृष्णवर्णीय मदतनीसांना मिळणारी अन्याय्य वागणूक व त्यांचा केला जाणारा वापर व तशा सगळ्याच स्त्रियांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या आयुष्यातील या प्रवासातील छोट्याछोट्या गोष्टींचे पुस्तक छापण्याची ही कथा आहे. एका गोष्टींच्या पुस्तकाची गोष्ट असूनही त्याही पलिकडे हा एक समांतर घडणारा अनौपचारिक इतिहास सुद्धा आहे. या गावातील तरुण श्वेतवर्णीय पत्रकार एमा आपल्याला लहानपणी सांभाळलेल्या आयाचा शोध घेत असते. कारण एकोणतीस वर्ष या घरात राहून एमाला पोटच्या मुलीसारखा सांभाळ करूनही तिचे वय झाले या कारणाने हकालपट्टी करण्यात आलेली असते. मुलगी भेटायला ...