श्री गणेश स्तवन ।
श्री गणेश स्तवन । अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानान्दमानन्दमद्वैतपूर्णम् परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्म-रूपं गणेशं भजेम आज तुझ्या या अशाश्वत मूर्तरूपाची भक्ती व पुजन करू की तुझ्या त्या नित्य अमर्याद, शाश्वत व निराकार रूपावर प्रेम करू. मला सद्गुणांचा आशीर्वाद देणाऱ्या अरे गणेशा , मला तू दोन्ही रूपांत अत्यंत प्रिय आहेस. गुणातीतमानं चिदानन्दरुपम् चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम् मुनिन्ध्येयमाकाशारुपं परेशं परब्रह्म-रूपं गणेशं भजेम उमेच्या मांडीवर सोंडेशी खेळणाऱ्या तुझ्या गोजिऱ्या रूपाला पहाते तेव्हा मीच साक्षात गौरी होते. इतके लोभस रूप असताना , तुला स्वहस्ताने मोदक भरविल्याशिवाय मला कसे बरे रहावेल ! जगत्-कारणं कारण- ज्ञानरुपं सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं जगद्व्यापिनं विश्र्ववन्द्यं सुरेशं परब्रह्म-रूपं गणेशं भजेम सर्व सत्याचा, प्रार्थनांचा आणि आविष्काराचा प्रकाश आहेस तू , तुझ्याशिवाय कुणाचे स्तवन करू मी !! सर्व जगातील ज्ञानाचे, प्रगतीचे , सुखांचे कलागुणांचे स्त्रोत अ...