सोप मेकिंग

सोप मेकींग खूप खूप दिवसापासून मनात होते सोप मेकींग आणि candle मेकींग शिकायचे आणि मुलांनाही शक्यते शिकवायचे. खूप विडीओ पण पाहिले पण सामान आणने झालेच नाही. आणि हे मागे पडत गेले. पण आता घरीच जायबंदी झाल्यामुळे पुन्हा शिकावे वाटले आणि प्रयोग करायचे ठरवले. मुलीलाही खूप उत्साह आहे याबाबत. आमच्या घराजवळ Michaels नावाचे मोठे दुकान आहे. ते छंदीष्ट लोकांचे नंदनवन आहे. मी आणि मुलगी तिथे तासन्तास रमू शकतो. त्यांचे एक कुपनही मिळते अधूनमधून मग ते आम्ही आमच्या छंदाच्या प्रयोगासाठी वापरतो. कधीतरी काही खूप छान बनवतो आणि कधी सगळे वाया जाते किंवा अपेक्षेप्रमाणे बनत नाही. पण ह्या प्रक्रियेत ऐवढी मजा येते की आम्ही पुन्हा पुन्हा काही ना काही करत रहातो/ घेत रहातो. काही माहिती नसताना एकदम पैसे घालून वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याऐवजी मला वाटले की मी किट घ्यावे, ज्यात सर्व साबन बनवता येईल. फार काही पर्याय दिसले नाही मग आम्ही एक बेसिक सोप मेकींग किट घेतले. कुपन जोडून ते सोळा डॉलर ऐवजी बारा डॉलरला मिळाले. त्यात सात साबण बनतील असेही लिहिले होते पण प्रत्यक्ष पाचच बनतील असे लक्षात आले.... नाही तर फार पातळ वड्या...