पोस्ट्स

चित्रपट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

8am Metro - गुलजार यांच्या कविता व दोघांची गोष्ट

इमेज
  <em>मी जर सोनमासळीचे शरीर घेवून या तलावाच्या तळाशी लपून राहीले असते तेव्हा तू चंद्रबिंबासारखा या पाण्यावर तरंगत आला असतास आणि माझ्या काळोख्या घरात चांदणे पसरवले असतेस तरंगत म्हणालाही असतास या एकाकी तळ्यात , 'तुझ्यावरही कुणी प्रेम केले असते'. मग मी किनाऱ्यावर येऊन तुझ्याशी मैत्री केली असती, तुझ्या सोनमासळीने तुझा एकाकीपणा दूर केला असता. या कल्पनेने तुला 'सुकून' मिळाला असता, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती</em> 'एट एम मेट्रो' सिनेमातली ही गुलजार यांची कविता. "एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं बन सकते" या हिंदी चित्रपटातील सर्व व्याख्यांना छेद देत कुठेतरी दूर नेऊन ठेवणारी थोडी परकी पण बरीचशी आपली वाटणारी दोन माणसांची कथा. ती कधीही स्त्रीपुरुषांची होत नाही, ना कधी 'जेन्डरलेस' स्नेहाचा बटबटीत दिखावा करते. ती शेवटपर्यंत दोन माणसांचीच राहते. तुम्हाला जे हवे ते तुम्ही घ्या, नको असेल तर नका घेऊ. इतके कंफर्टेबल व्यक्त..!  साधीसरळ आत्मविश्वास कमी असणारी संवेदनशील गृहिणी इरा व टागोर, चेकॉव्ह, हर...

दिठी

इमेज
  दिठी बघितला. कदाचित स्पॉयलर्स असतील. अनेक दिवसांपासून बघायचा ठरवून त्याला शांतचित्ताने पाहायचे ठरवल्याने राहून जात होते. किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, उत्तरा बावकर, ओमकार पटवर्धन किशोर कदमचाच(रामजी) चित्रपट आहे हा, बाकी सर्वांनी त्याच्या भूमिकेला न्याय मिळावा म्हणून आपापले काम चोख करूनही ते रूंजी घातल्यासारखे वाटत राहते. आपल्यापैकीच कुणातरी कलाकराचा अभिनय पूर्ण ताकदीने बाहेर पडावा म्हणून इतर कलाकरांनी एक पाऊल कुठेतरी मागे घेणं, तेवढा विश्वास दाखवणं फार सुंदर वाटतं. सुरेखशा जुगलबंदीत ह्याची क्वचित अनुभूती येते. सुरवातीपासून कोसळणारा सततधार पाऊस व मळभ आणि वारीला निघालेले तिघे चौघे. सगळेच विठूभोळे, कर्ताकरविता तोच आहे समजून कष्टात आयुष्य वेचणारे. अशाच प्रलयासारख्या कोसळणाऱ्या पावसाने नदीला आलेल्या पुरात रामजीच्या मुलाचा अघटीत मृत्यू होतो. ह्या पावसात विषण्णतेची छाया आहे. तुंबाड मधल्या पाऊस भयप्रद ताण देणारा होता, इथला विमनस्क करणारा वाटत राहतो. आपली त्याच्याशी नाळ जुळली की आपणही निरभ्र होण्याची वाट बघत रामजीचा तणाव सोसायला लागतो. ए...

दो पैसे की धूप चाराने की बारीश

इमेज
  पैसे की धूप चाराने की बारीश नेटफ्लिक्स दिग्दर्शक -दीप्ती नवल मनिषा कोईराला, रजित कपूर (तो कॅरिस्मॅटिक रजत कपूर नाही, व्योमकेश बक्शी मधला साधासरळ) अतिशय सुंदर चित्रपट आहे. जगावेगळ्या कथानकाला जाणून घ्यायची आवड असेल तर नक्की बघा. मला फारच आवडला. दीप्ती विदुषीच वाटत आली आहे कायम. मला तिनी काहीही केलं तरी आवडतंच. चित्रपटसृष्टीत बस्तान बसवण्यासाठी संघर्ष करणारा एक मनस्वी गीतकार, जो समलिंगी आहे. त्यामुळे एक वेगळा वैयक्तिक संघर्षही तो समांतरपणे करत आहे. मनिषाच्या नवऱ्याने मूल अपंग आहे, हे लक्षात आल्यावर जबाबदारी झटकून काढता पाय घेतला आहे. तिला उत्पन्नाचा कुठलाही मार्ग उरला नसल्याने ती वेश्याव्यवसाय करते आहे. पण मूल अपंग आणि हिचेही वय वाढत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणून तिचे उत्पन्न कमी होते आहे. हे दोघेही आपापल्या आयुष्यात दिशाहीन आहेत. योगायोगाने ह्यांची भेट होते व नाईलाजाने एकत्र रहायला लागतात, कारण तो गे असल्याने त्याला घर भाड्याने मिळणं कठीण होतं आणि परिस्थितीही विशेष नाही. मग तो तिच्या अपंग मुलाला सांभाळायला लागतो. त्याला खाऊपिऊ घालतो अगदी मजेदार मावशी सारखी माया करतो. त्यांचं नात...

डंकी

इमेज
  डंकी आवडला नाही. शाहरुख आवडतो तरीही सिनेमा नाहीच आवडला. त्याच्यातल्या अढळ स्टारपदाच्या लालसेने त्याच्यातल्या अभिनेत्याला तुडवून मागे टाकले आहे. सर्व सिनेमा, अभिनय, ते गाव, पटकथा सगळं बेगडी वाटत होतं. बोमन इराणी मला ओव्हररेटेड वाटतो, रिजिड देहबोली आणि मर्यादित हावभाव दाखवणारा चेहरा आहे. सूक्ष्म ॲटिट्यूड दिसत राहतो. पण इथे सगळे त्याच लेव्हलला उतरले आहेत. तापसी त्यातल्या त्यात प्रयत्न करत होती. सपोर्टिंग स्टाफ मोठ्या स्क्रीनवर काम मिळाले याच समाधानात 'ओव्हर' करत होता. शाहरुख अगदी भावनिक क्षणी सुद्धा उत्तेजीत वाटत होता, म्हणजे भांगड्याची एनर्जी दुःखद क्षणी दाखवत होता. त्याचे खांदे, हात ,पाय, चेहरा सगळं भांगड्याच्या तयारीत वाटलं. त्याने गमावलेला अभिनय एनर्जीने भरून काढायचा प्रयत्न केला आहे पण तेच नको होतं. अभिनयाची रेंज पूर्वीसारखी राहिली नाही फक्त हाईट आहे. आताच्या बेगडीपणात तो मोल्ड करतोय स्वतःला, जी त्याची USP नाही. सनबर्न झालेल्या स्किनवर डिस्टेंपर फासल्यासारखा दिसतोय ते वेगळंच. फारच फेक वाटला सिनेमा, वाईट एवढ्यासाठी वाटतं की त्यांनी खरं वाटावं असे प्रयत्न केलेत असं सुद्धा वाट...

ॲनिमल

इमेज
  मला अजिबात आवडला नाही ॲनिमल. हिंसेच्या बाबतीत मी असहिष्णू नाही, मला 'मिर्झापूर' आवडली होती. त्यात हिंसेला त्या पात्राच्या क्रौर्याचा/ विकृतीचा किंवा प्रतिशोधाचा व्यवस्थित आधार होता. ॲनिमलमध्ये मात्र 'इतका रक्तपात दाखवू की तुम्ही भंजाळून आवडला म्हणाल' असा अप्रोच आहे. इथल्या विकृतीला कसलाच आधार नाही किंवा कसली सुसूत्रताही नाही. कसल्याच भावभावनांचे स्पष्टीकरण दिले नाही. रणबीरच्याच नाही तर अनिल कपूरच्याही नाही. काहीही कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही. कुणीकडूनही चिळकांडी उडवायला निमित्त. बंदूक असतानाही कुऱ्हाडीनं मारताना/ गळा आवळून मारताना दाखवण्याचा काय हेतू होता. एकही विनोद दर्जेदार नाही, थोडंही हसू येत नाही. चीप तर आहेतच पण 'आऊट ऑफ प्लेस'ही आहेत. घरातील शेकडो लोकांसमोर डॉक्टर 'सेक्स लाईफ' विषयी कंसल्ट करते आणि हा मूर्खासारखा तिची उलटतपासणी करतो. सत्यनारायणाची पूजा आहे की काय. गाणीही बंडल आहेत, चड्डीचे 'हस्तांतरण' करून 'मराठी पंजाबी भाई भाई' दाखवणं किती बावळटपणाचं आहे. मला विकृतीपेक्षाही या सर्व मूर्खपणाची जास्त शिसारी आली. जरा इंटेलिजन्ट विकृती...

९६

इमेज
 96 बघितला. प्राईमवर सबटायटल्स सहित. (कदाचित स्पॉयलर्स असतील ) https://www.maayboli.com/node/84513?page=5 दोघांनी अतिशय सुंदर काम केले आहे. शाळकरी प्रेमपटांचा कंटाळा आला आहे पण ह्यांनी तो भाग फार ताणला नाही. एका रात्री पुरती सिंगापूरहून ती रियुनियनसाठी आलेली असते व बरेचसे मळभ दूर होऊन क्लोजर मिळवून परत जाते. सेथुपती जबरदस्त काम करतो, तृषाही तोडीसतोड. त्यानं हे शाळेतलं प्रेम अगदी हृदयातील अत्तराच्या कुपीसारखं जपून ठेवलं आहे. स्त्री म्हणून त्यागाचं व जे मिळेल त्यात सुख मानण्याचं ट्रेनिंग असल्याने ती थोडीफार 'मुव्ह ऑन' झाली आहे पण हा नाही. त्याला तिच्याबद्दल इतकं प्रेम आणि आदर  वाटतो की तो तिच्या आसपास प्रचंड ऑकवर्ड- निःशब्द होतो, तिला ही फजिती बघायची कधी मजा- कधी राग येतो. एक संपूर्ण रात्र एकांत मिळून अजूनही इतकं आकर्षण असून हे गप्पाच मारत बसतात. तिचा ओझरता स्पर्श झाला तरी हा शॉक लागल्यासारखं करतो. प्रेक्षकांना 'अरे, असू दे लग्न झाले असले तरी, एवढे आकर्षण आहे तर करा नं किस' असे होते, पण नाही. सेथुपती म्हणजे मर्यादापुरुषोत्तम..! तृषा हवं तेव्हा सात्विक- हवं तेव्हा मादक(PS)...

12th Fail (Hindi movie)

इमेज
  12th Fail सुरेख जमलाय.  खूप आवडला. विक्रांत मेस्सी ह्रितिक एवढा ग्लॅमरस नाही म्हणून त्याला टॅन करून जे तांबडं केलं आहे ते फार खटकत नाही. ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे, त्याला सर्वसाधारण दाखवणं अशक्य आहे. सुपर ३० आवडला होता. बघताना तुलना केली गेली नाही. त्याचं शरीरही किरकोळ आहे, त्यामुळे तो गिरणीत काम करताना ज्या हालचाली करतो त्या एकदम आदर्श वाटल्या आहेत. पांढरपेशे एवढे चपळ नसतात, हालचालीत चिवटपणा नसतो. आपल्याला त्यांच्या सारखं तासनतास उकिडवं बसता येत नाही, आपण मागच्या मागे पडतो. ते फार काटक असतात... ते त्याने फारच छान दाखवले आहे. पटकन भोरगं टाकून कुठंही अंग टाकतात. त्याने बाबा आल्यावर कसं झटकले तसं, मैत्रिणीलाही किती प्रेमाने स्टूल स्वच्छ करून दिला. मला त्या दोघांचे प्रेम फारच आवडले, त्या वयात जसं उच्छृंखल प्रेम असतं, त्याचा लवलेशही नव्हता. अतिशय पोक्त आणि समजदार नातं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्याने जी जिद्द, चिकाटी आणि तत्त्वनिष्ठता दाखवली त्यानं भरूनच आलं. त्याच्या मित्रांनी दिलेला सपोर्टही कौतुकास्पद, 'आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही' म्हणतो. हे कळणं किती प्रगल्भ आ...

जवान

इमेज
  जवान -नेटफ्लिक्स दोन तास पन्नास मिनिटे लांबीचा- एकतर अतिशय मोठा आहे. त्यात कथानक वीस मिनिटात संपेल इतकं आहे , बाकीचे वीस तास मारामारी आहे. एकदा मधेच मी पॉज केलं तर टिव्हीवरच्या कोपऱ्यात 'एक्स्टेंडेड कट' दिसलं, प्राण कंठाशी आले होते, त्यात 'अब क्या बच्चे की जान लोगे क्या' झालं. दोन शाहरुख खान आहेत. एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. हो, विक्रम आणि आझादमधे तेवढाच फरक आहे. मोठ्या शाखा-विक्रमचा ट्रॅक सुरू झाला की माझं लक्ष उडालं. सेथुपतीनी हाणहाणहाणल्याने मोठ्या शाखाला 'याददाश्त खो गयी' झाले व एक्सप्रेशन नदीत वाहून गेले. डोळे फिरवून काहीतरी मिनिमम दाखवतो. मोठा शाखा जेव्हा तरूण होता, तेव्हा तो जितेंद्रचे कपडे घालून फिरत होता. पण तेव्हा तो स्वतंत्र पात्र- विक्रम वाटलाच नाही. देहबोलीत कसलाही फरक नाही, फक्त कपडे-केस बदलले. बाबा व मुलगा शाखा म्हणजे जस्टिस चौधरीच जणू. :फिदी: तरूण शाखा -आझादलाच फॅन्सी ड्रेसमध्ये पाठवलंय असं वाटलं. दिपीका तर साडी नेहमीपेक्षा खाली नेसणारी निरूपा रॉयच. इतकं रडली आहे की ज्याचं नाव ते. स्त्रियांचा तुरुंग हा एक लेडिज हॉस्टेलचा भाग वाटतो. अधुनमधून ...

ड्रीम गर्ल २

इमेज
 <strong>ड्रीम गर्ल २ नेटफ्लिक्स</strong> आयुष्मान खुराणा, अन्नु कपूर ,परेश रावल, अभिषेक बॅनर्जी, अनन्या पांडे, असरानी, मनोज जोशी, राजपाल यादव, सीमा पहावा, विजय राज. जमला नाही, फार कंटाळवाणा कधीमधी सवंग व ओढून ताणून वाटतो. ड्रीम गर्ल १ उथळपणाला 'खो' देऊन परत आला होता पण धमाल होता. मला आवडला होता, आयुष्मानला मध्यमवर्गीय पात्राचा विनोद सही सही पकडता येतो. जो उच्छृंखल असला तरी चलाख असल्याने उथळ वाटत नाही. इथे ती पकड सगळ्यांचीच सुटली आहे. परेश रावल किती दिवसांनी दिसला, बरं वाटलं पण भूमिका गुळमुळीत आहे. अन्नु कपूर अतिशय उत्तम काम करतो पण इथं लक्षात रहात नाही. तसं सगळ्यांनाच अनन्या पांडे चावली असावी, त्यामुळे एवढी तगडी स्टारकास्ट असूनही सर्वांचीच कामं विस्मरणीय झालीत. आक्षेपार्ह नोंद म्हणजे अन्नु कपूरचे पात्र कर्ज फेडण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी मुलाला मुलगी करून बार गर्ल व्हायची गळ घालतो, नंतर हे प्रकरण उगाचच वाढवत नेले. बरं चीप तर चीप करकचून विनोद तरी करावेत तेही नाही, गाणी तर फारच बंडल. शेवटचं आयुष्मानचं 'प्यार तो प्यार होता है' हे सगळ्यांना दिलेलं प्रवचन तर का...

रॉकी और राणीकी 'कायकी' प्रेमकहाणी

इमेज
  काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो. पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं आजोबांच्या. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडते. एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं ना...

बंदिवान मी ह्या संसारी

इमेज
बंदिवान मी ह्या संसारी <a href="https://en.m.wikipedia.org/wiki/Bandiwan_Mi_Ya_Sansari">बंदिवान मी ह्या संसारी</a> आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.  दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी  १९८८ आशा काळे(कमल)  लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं.  गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.  मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गर...

सर्कस-द्राक्षासव- चित्रपट परीक्षण

इमेज
       रोहित शेट्टीच्या मनाप्रमाणे वागणारा एक वेडसर डॉक्टर व त्याचा सगळ्याला 'हो हो' म्हणणारा तेलकट भाऊ असतो. त्याची कायकी थेअरी असते, ती तो टाईम शेअर पद्धतीने पिळतपिळत आपल्याला सांगत असतो. ती कायकी थेअरी म्हणजे खून क्या रिश्त्यापेक्षा परवरिशचा रिश्ता कायकी घट्टं असतो. तो ठरवतो की गोलमाल मधल्या जमनादास आश्रमातल्या दोन जुळ्यांची अदलाबदल करायची, जी एकाचवेळी जन्मलेली व एकाचवेळी गोलमालाश्रमात आलेली असतात. या सिनेमात सगळं रोहितच्याच मनाप्रमाणे घडतं, आणि रोहितनी ठरवलंय की प्रेक्षकांचे डोके पहिलीला सहामाहीत नापास झाल्याने शाळा सोडलेल्या प्रौढापेक्षाही कैकपट कमी आहे. (संदर्भ #हमाल दे धमाल) त्यामुळे तो त्याला हवे ते दाखवणार व आपण बघून हसणार. त्यामुळे हे रॉय-जॉय बंधूद्वय त्या जुळ्या बाळांच्या दोन सेटची अदलाबदल करतात. हे एकदम १९४२ च्या काळातले दाखवलेयं , मधेच 'भारत छोडो' वगैरेचे नारे व मशाली घेऊन जाणारी लोकं इकडून कायकी तिकडं जातात. त्यांनी सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेत व सिनेमातल्या मेन लोकांनी भडक रंगांचे ओव्हरसाईज सूट व मागून आणलेल्या साड्याब्लाऊज घातलंय. एखाद्या गरीब माणसा...

सिनेमा आणि मी : भाग १

इमेज
मूळ कमेंट    ॲन्ट मॅन बघितला. तिथे जाऊन नाव माहीत नसल्याने "Three tickets for Ant man and the whatever, please" म्हटले. मार्व्हलच्या परंपरांचे पाईक असल्याने सगळं बघायचं असं तत्त्वं आहे. अशात आलेल्या थॉर पेक्षा बरा व ब्लॅक पॅन्थरपेक्षा फारच बालीश वाटला. मायकल डग्लस उगीच गमती केल्यासारखे करतो, पॉल रड आजन्म कन्फ्यूज दिसतो, मिशेल फायफर सतत ओढल्यासारखा चेहरा व विचकटलेले केस घेऊन वावरते. तीस वर्षे क्वांटम मधे अडकून काय घडले हे तिने घरी सांगितलेलं नसतं. व्हिलन चांगला होता पण त्याचे संवाद फार साधारण होते. मधेच तो साऊदिंडियन सिनेमातल्या विष्णूसारखा निळा व्हायचा. त्याचं विमानाचं काही तरी फायफरताई दुरुस्ती करते म्हणून तोडून वर सिरम सांडून टाकतात. त्याला बऱ्याच विश्वांचा व टाईमलाईनचा सत्यानाश करायचा असतो, मग त्याला येतो राग ! येणारच नं , दळण आणायला गेलो आणि लाईट गेले एवढं सोपं थोडीच आहे. तिचा राग म्हणून तिच्या नातीला एका गुंडांच्या मदतीने जो रोबो-हम्प्टीडम्प्टी सारखा दिसतो, ओलीस धरून पॉल- जावयाला त्याच्या DNA मुळे सोडतात. हे मला कळलं नाही सासू आणि जावई DNA , असो. मग त्याचे तिथे रिप्लिका ...