पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिनेमा आणि मी : भाग १

इमेज
मूळ कमेंट    ॲन्ट मॅन बघितला. तिथे जाऊन नाव माहीत नसल्याने "Three tickets for Ant man and the whatever, please" म्हटले. मार्व्हलच्या परंपरांचे पाईक असल्याने सगळं बघायचं असं तत्त्वं आहे. अशात आलेल्या थॉर पेक्षा बरा व ब्लॅक पॅन्थरपेक्षा फारच बालीश वाटला. मायकल डग्लस उगीच गमती केल्यासारखे करतो, पॉल रड आजन्म कन्फ्यूज दिसतो, मिशेल फायफर सतत ओढल्यासारखा चेहरा व विचकटलेले केस घेऊन वावरते. तीस वर्षे क्वांटम मधे अडकून काय घडले हे तिने घरी सांगितलेलं नसतं. व्हिलन चांगला होता पण त्याचे संवाद फार साधारण होते. मधेच तो साऊदिंडियन सिनेमातल्या विष्णूसारखा निळा व्हायचा. त्याचं विमानाचं काही तरी फायफरताई दुरुस्ती करते म्हणून तोडून वर सिरम सांडून टाकतात. त्याला बऱ्याच विश्वांचा व टाईमलाईनचा सत्यानाश करायचा असतो, मग त्याला येतो राग ! येणारच नं , दळण आणायला गेलो आणि लाईट गेले एवढं सोपं थोडीच आहे. तिचा राग म्हणून तिच्या नातीला एका गुंडांच्या मदतीने जो रोबो-हम्प्टीडम्प्टी सारखा दिसतो, ओलीस धरून पॉल- जावयाला त्याच्या DNA मुळे सोडतात. हे मला कळलं नाही सासू आणि जावई DNA , असो. मग त्याचे तिथे रिप्लिका

सच कहुं तो- नीना गुप्ता : थोडा परिचय -थोडं चिंतन

इमेज
  ह्या पुस्तकाविषयी ऐकलं होतं, पण वाचनाच्या बाबतीत अचानकच रस वाटणं बंद झाल्याने हे आणि इतरही बरीच पुस्तकं मागेमागे पडत गेली. एकदातर ह्या पुस्तकाची १०० पानं पंचेचाळीस मिनिटात वाचली, 'पानं मोजणं' कधी करेन वाटले नव्हते. पण मी त्या अ-वाचकाच्या गर्तेतून बाहेर पडतेयं हेही थोडके नाही. तरीही पूर्वीचा 'राक्षस' परत हवायं. जयश्री गडकरचे 'अशी मी जयश्री' सोडून मी याआधी कुठलेही सिने किंवा नाट्यसृष्टीतल्या लोकांचे आत्मचरित्र वाचलेले नव्हते. दादा कोंडकेचे 'एकटा जीव' आईने सुचवले होते, तेव्हा 'ती तूच आहेस का, जिने मला दादा कोंडकेचा एकही सिनेमा बघू दिला नाही' झाले होते !! एवढंच नाही तर तिने 'फडके - अर्नाळकर' पण गाठोड्यात घालून भिंतीतल्या कपाटात वर टाकून दिले होते. हे सांगायचं कारण की नीनाच्या आईने पण 'लडकी बिगड़ जायेगी' या भीतीपोटी अपार कष्टं घेतले होते. ती तिचं 'बिघडली', आपण आपलं बिघडू.  नीनाच्या प्रेमप्रकरणांमधल्या संभाव्य 'रसाळ' तपशीलामुळे ते पुस्तक हातोहात खपलेही/खपतंही असेल. तिने व्हिवियनची, मसाबाची, सर्वांचीच प्रायव्हसी जपण्यास