पोस्ट्स

मुक्तस्रोत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून

इमेज
  अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून (   उपोद्घात:   ही एक दुःखद कथा आहे. २८ फेब्रुवारी हा 'दुर्मिळ आजार दिवस' मानल्या जातो. फेसबुकच्या अचानक आलेल्या फोरवर्डने कळले व आवर्जून लिहावे वाटले.  उपचार, उपाय वा औषध उपलब्ध नसलेले आजार, जेनेटिक कंडिशन्स असलेल्या अनेक व्यक्ती या जगात आहेत. याने बऱ्याच रूग्णांच्या व त्यांच्या जोडीदारांच्या, पालकांच्या, अपत्यांच्या, केअरगिव्हर्सच्या आयुष्यात जे एकाकीपण येते त्यावर ही कथा बेतलेली आहे. या कथेला शेवट नाही. त्या दु:खाला, एकाकीपणाला व त्यामुळे येणाऱ्या दृष्टीकोनाला व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न आहे, तरीही आव्हानात्मक परिस्थितीतही ते त्यांच्या तेजाने तळपत रहातातचं याचं कौतुकही आहे. या प्रकारचं हे माझं पहिलचं लेखन आहे.  काही जणांना नकारात्मक वाटेल पण मला वास्तवाच्या जवळ जाणारे हवे होते. उगीच सत्याकडे दुर्लक्ष करून बेगडी सकारात्मकता थोपवून लिखाण प्रामाणिक राहिले नसते. बहुतेकांसाठी काल्पनिकच !) आम्ही : अरे वा ! या, या, दमला असालं नं बसा. काय म्हणतोयं पृष्ठभाग... ते:  अहो , तिथे काय कमी त्रास आहेत रोज नवीन काही तरी सुरू असते. आम्ही: तेही खरं आहे म्हणा, आम्