पोस्ट्स

मराठी चित्रपट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पाणी

इमेज
  पाणी   चित्रपट बघितला. खूप आवडला. माझ्या नांदेड (मला मिरवायचे किंवा लाजायचे- दोन्ही नसते, 'जे आहे ते आहे' असाच अप्रोच असतो) जिल्ह्यातली लोहा तालुक्यातील नादरगाव नावाच्या खेड्यात घडणारी कथा आहे. हनुमंत केंद्रेे नामक युवक पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतो. त्यासाठी एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या गावकऱ्यांवा व खास करून भजनी मंडळ व बचत गटाच्या क्लृप्त्या वापरून गावातील स्त्रियांना एकत्र आणतो. संपूर्ण गावाच्या सहकार्याने व श्रमदानाने गावाला पाण्याच्या सोयीसाठी स्वयंपूर्ण करतो. लग्नासाठी सांगून आलेली मुलगी फक्त गावात पाण्याची सोय नाही म्हणून जेव्हा तिचे वडील नकार देतात तेवढं निमित्त हनुमंताला ह्या कार्यासाठी प्रेरणा देणारं ठरतं. यातील प्रत्येक गाव माझ्या ओळखीचे आहे, लोहा व जिथे सुबोध भावेे भाषण देतो तो कंधार तालुका, माळाकोळी हे सगळेच मी ऐकलेले व बघितलेले आहे. पाणी टँकरने आणून विकणे, लोकांच्या रांगा, धुणं धुताना कपडे भिजवलेले पाणी भांड्याला वापरणे, कोरड्या पडलेल्या विहिरी- नद्या, कितीही खोल खणून- खंदून फेल गेलेले बोअरचे अपयशी प्रयत्न, आटलेले ओढे, पाण्याचा टि...

दिठी

इमेज
  दिठी बघितला. कदाचित स्पॉयलर्स असतील. अनेक दिवसांपासून बघायचा ठरवून त्याला शांतचित्ताने पाहायचे ठरवल्याने राहून जात होते. किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, उत्तरा बावकर, ओमकार पटवर्धन किशोर कदमचाच(रामजी) चित्रपट आहे हा, बाकी सर्वांनी त्याच्या भूमिकेला न्याय मिळावा म्हणून आपापले काम चोख करूनही ते रूंजी घातल्यासारखे वाटत राहते. आपल्यापैकीच कुणातरी कलाकराचा अभिनय पूर्ण ताकदीने बाहेर पडावा म्हणून इतर कलाकरांनी एक पाऊल कुठेतरी मागे घेणं, तेवढा विश्वास दाखवणं फार सुंदर वाटतं. सुरेखशा जुगलबंदीत ह्याची क्वचित अनुभूती येते. सुरवातीपासून कोसळणारा सततधार पाऊस व मळभ आणि वारीला निघालेले तिघे चौघे. सगळेच विठूभोळे, कर्ताकरविता तोच आहे समजून कष्टात आयुष्य वेचणारे. अशाच प्रलयासारख्या कोसळणाऱ्या पावसाने नदीला आलेल्या पुरात रामजीच्या मुलाचा अघटीत मृत्यू होतो. ह्या पावसात विषण्णतेची छाया आहे. तुंबाड मधल्या पाऊस भयप्रद ताण देणारा होता, इथला विमनस्क करणारा वाटत राहतो. आपली त्याच्याशी नाळ जुळली की आपणही निरभ्र होण्याची वाट बघत रामजीचा तणाव सोसायला लागतो. ए...

ही अनोखी गाठ

इमेज
 ही अनोखी गाठ' बघितला. #स्पॉयलर्स असतील.‌ श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, सुहास जोशी, शरद पोंक्षे आणि ऋषी सक्सेना ( 'काहे दिया परदेस' मधला शिव) सगळ्यांचा अभिनय कृत्रिम आहे. गाणी बरी वाटतात पण नंतर आठवत नाहीत. शरद पोंक्षे 'चिडक्या बिब्ब्याच्या रोलमधे अडकला आहे. 'बाई पण' मधेही भाजी- चटणी वरुन किरकिर करत होता. इथंही बायकोला कानाखाली देतो, मुलींना ताब्यात ठेवतो. मोठ्या मुलीचं बळच लग्न ठरवतो जी एम ए करत असते आणि तळपदेचं पात्र आठ वर्षांनी मोठं दाखवलं आहे. मोठी मुलगी अचानक मरते मग गौरी इंगवले - आम्ला तिचं नाव, जी त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असते. तिला अचानक बोहल्यावर उभे करतात. ऋषी कॅमेरामन असतो हिला नाचताना बघून ती त्याला आवडायला लागते. ही दोनतीन भेटीत स्वतःला काडीमात्र प्रेम नसतानाही बळजबरीच्या लग्नाआधी पळून जायला बघते तर ऋषी तिला स्टँडवर घ्यायला येत नाही. ह्यापेक्षा थक्क करणारं म्हणजे तरीही ती लग्नानंतर सुद्धा त्याच्यामागे जाते. सातत्याने येणारा एकही रेड फ्लॅग तिला दिसत नाही. तिचंही कुणावरच प्रेम नसतं, कुणाचंच कुणावर प्रेम नसतं. तरीही टॉक्सिक पेट्रियार्कीला शर्करावग...

आत्मपॅम्फ्लेट

इमेज
  मला तर खूपच आवडला आत्मपॅम्फ्लेट. ते नॅरेशन जरी काही ठिकाणी लांबले असले तरी प्रेक्षक म्हणून एकदा त्याचा वेग अचूकपणे पकडला की आपण बरोबर रोलर कोस्टर सारखं खाली-वर जातो. नुकताच बघितलेला हेन्री शुगरही असाच वाटला होता. नॅरेशन वेगवान असण्याने कथानक एकाग्रता कमी असलेल्या प्रेक्षकाला धरून ठेवते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून टीमचं कौतुक वाटलं आणि जिथे मार्केट फेअर नाही तिथे कलाकृती नवीन धाटणीत सादर करणे याला हिंमत लागत असावी. माझ्यामते 'सर्वधर्मसमभाव' ह्या कन्सेप्टला कल्पकतेचा डेड एन्ड आला आहे. 'अमर ‌अकबर ॲन्थनी' पासून- ते 'बॉम्बे'- ते मागच्या आठवड्यात आलेला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' पर्यंत सगळे जॉन्रा+कथाप्रकार करून झालेले आहेत, तरीही हा सिनेमा मला रिफ्रेशिंग वाटला. कारण सगळ्या जातींच्या कंडिशनिंगवर वास्तववादी भाष्य करूनही सिनेमा कुठेही कडवट वा टोकदार झालेला नाही, त्याने प्रेक्षक म्हणून तो सहज स्विकारता येतो व प्रवचनाचं ओझं होत नाही. घराण्याचा मूळ पुरुष 'स्त्री' असणं हेही आवडलंय, आईबाबा, शिक्षक आवडले. मित्र तर खूपच आवडले. भावांनोने तर शेवटी धमाल ...

बंदिवान मी ह्या संसारी

इमेज
बंदिवान मी ह्या संसारी <a href="https://en.m.wikipedia.org/wiki/Bandiwan_Mi_Ya_Sansari">बंदिवान मी ह्या संसारी</a> आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.  दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी  १९८८ आशा काळे(कमल)  लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं.  गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.  मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गर...