पोस्ट्स

ललित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खरडण्यामागचे खरडणे कदाचित...

इमेज
  मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा -२०२४ मराठी: लेखन घडते कसे - उपक्रम ---------------- शाळेत असल्यापासून लिहायचे. जवळजवळ प्रत्येक निबंध स्पर्धेत पहिला नंबर यायचा. चित्रकला, संस्कृत, हिंदी, वक्तृत्व, गणित, रामायण, अभिवाचन, विज्ञान, रांगोळी, कलाकृती बनवणं सगळ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, बहुतेकवेळा नंबरही यायचा आणि सगळ्यातच रूची होती. पण लेखनात जास्त मुक्त वाटायचं. एक्स्ट्रोव्हर्ट मुलगी होते मी शाळा कॉलेजमध्ये. एकदा आंतरशालेय निबंध स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पपांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यामुळे मी एक्स्प्रेसिव्ह आहे, नाहीतर नांदेडसारख्या लहान शहरात नव्वदीच्या दशकात मुलींची तोंडं दाबण्याला 'वळण लावणं' समजायचे. पर्यायाने मला आजूबाजूला उद्धट समजण्यात यायचं.‌ नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. माझ्या जन्माआधीच ते गेले पण माझे आजोबा आणि वडील फार वेगळे आहेत. आमच्या घरी फार चांगल्या माणसांचं येणंजाणं होतं आणि श्रीमंत नाही पण तिथल्या इतरांपेक्षा चांगल्या- उच्च वैचारिक वातावरणात मला रहायला मिळाले आहे. वाड्यातल्या भिंतीतली कपाटं पुस्तकांन

मी का वाचते ??

इमेज
आपण जे काही वाचतो, अगदी काहीही.... ते आपण स्वतःतल्या 'न जगलेल्या' , 'न अनुभवलेल्या' आयुष्यासाठी वाचत असतो. वैचारिक लेखन वाचण्यामागे तर लेखक सांगतोय त्या मनाच्या प्रतलात जाण्याचीच धडपड असते. जिथे एरव्ही आपल्याला involuntarily जाता येत नाही, कुणीतरी न्यायला लागतं. त्यामुळे हा प्रभाव फार काळ टिकत नाही. मगं आपण अजून वाचतो...अजून वाचतो....  हे विष  साधेसुधे नाही 'हलाहल' आहे. ज्या वेळी स्वतःला आपापले तिथे जाता येईल तेव्हा हे गूढच संपून जाईल. हॉलीवुडचे नट कसे म्हणतात, I do my own stunts, तसं I create my own हलाहल. दुसऱ्याच्या अनुभवाची खोली वाचणे व स्वतः ते अवकाश अनुभवणे असा फरक आहे. मगं आपले highs हे अजून higher आणि lows हे अजून lower मागतात आणि कौटुंबिक तेलकट चण्याफुटाण्यात मन रमत नाही/ किक बसत नाही. हे माझं 'मी (वैचारिक) का वाचते? ', यावर शोधलेलं उत्तर आहे. ते चूक/बरोबर असं काहीही नाही, फक्त निरिक्षण आहे.      मी का वाचते/वाचायचे सांगते. तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या मला एकसंध होण्याची धडपड होती. त्यामुळे कुठे तरी आपले दुवे शोधत वाचायचे. प्रत्येक पुस्तकात आपल

काही गाणी आणि आरस्पानी

इमेज
       काही गाणी आणि आरस्पानी     बन लिया अपना पैगंबर    तैर लिया सात समंदर    फिर भी सुखा मन के अंदर    क्यों रह गया    रे कबिरा मान जा....    रे फकिरा मान जा..   आजा तुझको पुकारें तेरी परछाईंया     साप जसा कात टाकतो तशी मी लिहिते,  दुसरी इतकी चपखल आणि क्रीपी उपमा याक्षणी तरी आठवत नाही. काही तरी साचल्यासारखं वाटतं , व्यक्तं झालं की मोकळं होऊन आपापल्या मार्गाला जाता येतं. सापाला त्याचाच भाग असलेल्या काती विषयी काही विशेष आसक्ती वाटत नाही पण मुक्तताही हवी असते आणि सक्तीही नको असते, तसंचं काहीसं होऊन बसतं, बहुतेक मी विचित्र आहे, माझा प्रवास आरस्पानी असावा एवढाच आग्रह आहे !     प्रवासात काही का येईना सगळी बेटंच आहेत, ध्रूवपद नाही, हे कळाल्याने बहुदा बऱ्याचशा गोष्टी 'whatever' गटात गेल्यात. भारतातून परत येऊन तीन महीने होतील, यावर वैयक्तिक न होता लिहावं असं वाटलं. पण पझलचे हजारो तुकडे एकदाच अंगावर पडल्यावर कसं लिहिणार. जे मलाच कळत नाहीये ते कसं बांधणार, वाचणाऱ्याला कसं समजणार !!! अधिकतर आठवणी स्मृती होतात, काही आपलाच अंश होऊन पुनःप्रत्ययाचे ecstatic झटके देत रहातात.     बंध

अ....... आणि अस्मि

इमेज
अ..... आणि अस्मि   अ   ----  हा 'अ' अक्षर, अहं, अनास्था, अतिरेकीपणा, अचाट, अफाट, अजागळ, अथांग, अस्ताव्यस्त, अज्ञात, अव्यक्त, अबोध .......... यापैकी कशाचाही असू किंवा नसूही शकतो. अस्मि  ----हा अस्मि "मी आहे" किंवा "I am" या अर्थाने लादलेला असू किंवा नसूही शकतो. हे दोघेही एकमेकांची जागा घेऊ शकतात , त्यामुळे वेगवेगळे आहेत असे म्हणण्यातही अर्थ नाही. ( एकंदर आपल्या अहंशी ('जीव' या अर्थाने) आपल्या 'अस्मि'( मी आहे) या जाणीवेशी झालेला संवाद किंवा सेल्फ टॉक,  थेरपी सेशनच्या खिळखिळीत चौकटीत कसेतरी बसवलेल्या कथारूपाने.................) ******************* अस्मि : रेने डेकार्ट म्हणून गेलायं, "I think therefore I am", गप्प बसला असता तर चाललं नसतं का, तसं तर मीही गप्प बसले तर चाललं असतं म्हणा. अ: मी काय बोलायचे हेही तूच ठरवणार आहेस नं, मगं चटकन ठरवं. अस्मि: काय अर्थ आहे बरं तुला 'अ' ?? एक अक्षर फक्त , खरंतर आवासून बसायचीच लायकी पण अथांगपणामुळे तुला बोलतं करायला लागतंय. अ: मी अ-क्षर आहे, मला मरण नाही, त्या अथांग मनाला मी अमर्याद सुद्धा केल

निरंजन

इमेज
                   निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं. ' निरंजन' या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला. माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.            आसपास छोटी मोठी मंदिर असणाऱ्या छोट्या गावाच्या जुन्या भागात सगळे बालपण गेले. त्यामुळे ती मंदिरे त्यातले अर्चाविग्रह हे माझ्या आयुष्याचा भाग होते. आपण जसे आपल्या आईवर आपली श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे याचा विचार करत नाही. सहवासाने परमेश्वरा बाबतीत तसेच झाले होते. आयुष्याचा भाग असल्याने आणि सतत द्रुष्टी समोर असल्याने त्याच्या बद्दल प्रेमच वाटायला लागले. तो सहवास म्हणजे सहज उपलब्ध असलेल्या

श्री गणेश स्तवन ।

इमेज
  श्री गणेश स्तवन । अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानान्दमानन्दमद्वैतपूर्णम् परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्म-रूपं गणेशं भजेम आज तुझ्या या अशाश्वत मूर्तरूपाची भक्ती व पुजन करू की तुझ्या त्या नित्य अमर्याद, शाश्वत व निराकार रूपावर प्रेम करू. मला सद्गुणांचा आशीर्वाद देणाऱ्या अरे गणेशा , मला तू दोन्ही रूपांत अत्यंत प्रिय आहेस. गुणातीतमानं चिदानन्दरुपम् चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम् मुनिन्ध्येयमाकाशारुपं परेशं परब्रह्म-रूपं गणेशं भजेम उमेच्या मांडीवर सोंडेशी खेळणाऱ्या तुझ्या गोजिऱ्या रूपाला पहाते तेव्हा मीच साक्षात गौरी होते. इतके लोभस रूप असताना , तुला स्वहस्ताने मोदक भरविल्याशिवाय मला कसे बरे रहावेल ! जगत्-कारणं कारण- ज्ञानरुपं सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं जगद्व्यापिनं विश्र्ववन्द्यं सुरेशं परब्रह्म-रूपं गणेशं भजेम सर्व सत्याचा, प्रार्थनांचा आणि आविष्काराचा प्रकाश आहेस तू , तुझ्याशिवाय कुणाचे स्तवन करू मी !! सर्व जगातील ज्ञानाचे, प्रगतीचे , सुखांचे कलागुणांचे स्त्रोत असूनही मूळ निर्गुण निराकार असलेल्या तुला मी वंदन करते. असाच दरवर्षी मूर्तरूपाने-मूर्तीरूपाने ये आणि माझ्या ह्रदयाती

रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी

इमेज
  रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी पश्चिम बंगालबद्दल प्रचंड, प्रचंड आकर्षण वाटतं त्याची मुख्य कारणं म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दक्षिणेश्वरी , रवींद्रनाथ टागोर व शांति निकेतन ... मी मागच्या जन्मी बंगाली होते बहुतेकं ! रवींद्रनाथांनी ज्या पद्धतीची लेखन व काव्यनिर्मिती केली आहे , केवळ अद्भुतं ! त्यांच्या नायिका तर आजही खऱ्या वाटतात , कालबाह्य असूनही त्यांचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व कुठेतरी मनात मुरतंच. कालबाह्य म्हणताना वाटतं की खरंच अगदिच कालबाह्य आहे का कारण अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे स्त्रियांना , माझ्या दृष्टीने ज्याला ध्येय म्हणता येईल ते कधीकधी एक प्रकाशवर्ष दूर आहे असं वाटतं. सध्या समाज म्हणून ढोबळमानाने आपण, दारू पिऊन मारत "तर" नाही/ नोकरी "करू" देतो / "शिकू" देतो / बाहेरचं "सुद्धा" खातो / मतं "सुद्धा" विचारतो / घरात "मदत" करतो म्हणजे मी/हा मर्यादा पुरूषोत्तम आहे या स्टेशनावर कुठेतरी लटकतं आहोत. ही मर्यादा पुरूषोत्तम उपमा लिंगनिरपेक्ष आहे हं ! कुठेतरी स्त्रियांनी पण या मान्यतांना रूढी/दैव/नैसर्गिक कल समजून यां

अपरिग्रह मनाचा !

इमेज
  अपरिग्रह मनाचा ! मला लहानपणापासून आयुष्याविषयी फार प्रश्न पडतात , त्यात नैराश्य नाही (मी एक आनंदी मुलगी आहे) तर केवळ निखळ जिज्ञासा असते. आई कोरोनाने गेल्यापासून मला मृत्यु विषयी सुद्धा प्रश्न पडायला लागले. एकदम अदृश्य झाली ती , मला काही सांगायचं बोलायचं असेल तिला , निरोपसुद्धा नाही घेतला. मी सातासमुद्रापार , काही अर्थ नाही कशाला. काही तरी आयुष्याशी नातं होतं त्यातून स्वतंत्र वाटायला लागला, म्हटलं तर निर्मूळ म्हटलं तर मुक्तं. नेमक्या कुठल्यातरी भावना आपण पकडून ठेवतो व त्याला आयुष्यं समजतो, समजा एकेदिवशी त्या भावनाचं अदृष्य झाल्यानंतर जे उरते ते काय असते ??! म्हणजे जी आधी होते ती मी होते की ही उर्वरीत मीच खरी मी आहे. माणूस म्हणजे भावनांच्या संचयाने ओतप्रोत असलेला मातीचा गोळा आहे. मृण्मयं आहे , मगं या मृण्मयातलं चिन्मयं कुठे आहे?! सारखं काही नं काही गोळा करायचं आणि त्यामुळे होणाऱ्या परिग्रहाच्या व्याप्तीवरून आयुष्याचं सामृद्ध्यं जोखायचं. दृश्य-अदृश्य ओझं जपायला जीवाचं रान करायचं , जणू हीच आपली ओळख आहे. ठराविक आकाराची माती, ठराविक आवडीनावडी, ठराविक सुखदुःख, भावना , आनंद, राग, लोभ हा पसार