लिमिटलेस

पीकॉकवर ब्रॅडली कूपर, रॉबर्ट डी नेरो, ॲबी कॉर्निश यांचा ' लिमिटलेस ' पाहिला. सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे पण भरपूर मारामारी आहे. ब्रॅडली हा एक रायटर्स ब्लॉक आलेला, महत्त्वाकांक्षी नसलेला एडी मोरा नावाचा अपयशी- दिशाहीन पूर्वी एक औट घटकेचे लग्न होऊन घटस्फोट घेतलेला लेखक आहे. त्याची लिन्डी नावाची सध्याची गर्लफ्रेंड पण त्याला सोडून जातेय. या अशाच दिशाहीन काळात त्याला एक्स बायकोचा भाऊ मार्केट मधे आलेले आणि क्लिनिकल ट्रायल न झालेले नोआट्रॉपिक प्रकाराचे ड्रग देतो. नोआट्रॉपिक -कॉग्निटिव्ह क्षमता वाढवणारे. सगळीच इंद्रिये धारदार करून टाकणारे. एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, निरीक्षणशक्ती यासहित सगळेच आयक्यू चार आकडी होऊन जाणारे. सगळ्या भाषा यायला लागतात, कुठल्याही विषयात नैपुण्य मिळवायला काही क्षणांचे निरीक्षण पुरायला लागते. पुढे या NZT नामक गोळ्यांनी तो सुपरह्यूमन होऊन ट्रेड आणि स्टॉक मार्केटची अंदाज घेत झटपट कुठल्याकुठे जातो. पण या गोळ्यांचे विथड्रॉवल सिम्पट्म्स dissociative fugue यायला लागतात म्हणजे आपण कुठे होतो आणि काय केले हे काही काळासाठी मेमरीतून अदृश्य होऊन जाते. अशा टाईम स्...