पोस्ट्स

पाककृती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उपवासाचे थालिपीठ व चटणी

इमेज
थालिपीठ ** १. दोन ते अडीच वाटी शिंगाड्याचे पीठ २. दोन वाटी राजगीऱ्याचे पीठ ३.२ उकडलेले बटाटे ४.हिरव्या मिरच्या ४-५ ५. आल्याचा तुकडा ६. जिरे चमचाभर ७. मीठ (सैंधव किंवा नेहमीचे ) ८. दाण्याचा कूट अर्धी वाटी ९. तेल १०.दोन तीन मोठे चमचे दही ११.Aluminium foil चटणी** १. अर्धी वाटी शेंगदाणे २.अर्धी वाटी पाणी ३.अर्धी वाटी दही ४. २-३ हिरव्या मिरच्या ५.आल्याचा तुकडा ६.मीठ व साखर ७.फोडणीसाठी तूप व जिरे. चटणी* सर्व साहित्य मिक्सर मधून फिरवून घ्या. व फोडणी टाका. घट्ट पातळ आवडीनुसार करा मी थोडी मध्यम ठेवते .उपवासासाठी तूप जिरे फोडणी करून घाला. मी तेल- मोहरी फोडणी केली आहे कारण आमच्या घरी कोणी उपास करत नव्हते. थालिपीठ* मिरच्या, चमचाभर जिरे व आले मिक्सर मधून काढून पिठात टाका. सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून तिंबून घ्या. नेहमीच्या थालिपीठा प्रमाणे. व foil च्या मदतीने थापवून तव्यावर दोन्ही बाजूला तेल घालून भाजून घ्या. Foil ला सुद्धा एक थेंब तेल लावून पसरवून घ्या म्हणजे लवकर वेगळे होऊन तव्यावर टाकताना सहज निघेल. टाकल्यावर आच मध्यम ठेवून झाकावे व चुर् हा नेहमीचा आवाज आला की उलटून दुसऱ्या बाजूने भाज

निगुतीची बर्फी

इमेज
  निगुतीची बर्फी "अरे या क्रीमला तर वास येतोय शिवाय डबा पण फुगल्यासारखा वाटतोय , एक्सापयरी अजून झाली नाही तरीही, ही उष्णता+आर्द्रता ह्याने असंच होत रहाणार काही महिने......." खरं तर वरील संवादाला अवतरण चिन्हे द्यायची काहीच गरज नव्हती कारण ते मनात म्हंटलं होतं , पण तुम्ही लक्ष देऊन वाचावं म्हणून केलेली आयडिया का काय आहे . भाचीला युट्यूबवर स्ट्रीटफुड विडिओ बघून पेढे खावे वाटले मगं काय मला फार कौतुक आहे तिचे ..आणले लगेच क्रीम आणि मिल्क पावडर , मी नेहमी याचीच आधी कढी करून त्याला आटवत ,आटवत, आटवत खवा करते. ही युक्ती मला निरंजनच्या मराठी (शिकवणाऱ्या) आजी यांनी दिली तेव्हापासून आम्ही कित्येक मथुरेसदृश पेढे, खव्याचे मोदक गट्टम केले तेवढी त्यानी मराठी पुस्तकं सुद्धा वाचली नसतील. पणं आमचे काळ काम वेग +स्वयंपाक याचे गुणोत्तर काहीही असू शकते. सगळ्या बाबतीत छोटे छोटे व्यवस्थित नियोजन करणारी मी रोजच्या स्वयंपाकाच्या बाबतीत मात्र spontaneous वगैरे आहे. ऊरक फारसा नाही तरी आत्मविश्वास दुर्दम्य आहे. रिबेल खवय्ये असल्याने क्रीम आणून ठेवल्यावर भाची सकट आम्हाला खमंग, चमचमीत खायचे डोहाळे लागले. घरा