पोस्ट्स

विनोदी लेखन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

थोडेसे 'दिलखेचक' चिंतन

इमेज
       पहिलीत असताना वडिलांना विचारले 'प्यार' म्हणजे काय , तेव्हा ते 'कुठे ऐकलेसं गं , कुठे ऐकलेसं गं' करून घाबरून उठून गेले. 'प्यार'मध्ये एवढं घाबरण्यासारखं काये बरं , ते स्वतः एवढे गाणे ऐकायचे मगं मला न कळले तर काय नवल.... पण हा विचार करायला आणि दोनचार दिवस गाणी बंद करून अपराधी वाटून घ्यायला ते काही आजकालचे पालक नव्हते. ते गाणे ऐकत राहिले मी 'शिकत' राहिले. 'प्यार'चा रस्ता दिलापर्यंत जाणारच , शास्त्र असतं ते. त्यामुळे दुसरीपर्यंत मला 'दिला'बद्दल कळलं. यावेळेस मी आईकडे गेले व दिलाची चौकशी केली. त्यावेळी ती बावचळली असेलही पण तिने तसे दाखविले नाही. ती सगळ्या गोष्टींना 'भक्तप्रल्हाद वळण ' द्यायची. सगळ्या भावनांना एकतर मातृत्व किंवा भक्तीचे असंबद्ध स्वरूप देऊन निकोप भावना , बालसुलभ उत्सुकता यांचा 'मोजो' ठार करायची. तेही इतकं हसतंखेळतं की मोठ्यांच्या सुद्धा लक्षात येऊ नये. तिने दिलाचा अर्थ 'काळीज' सांगितला. वरवर पहाता बरोबर आहे पण त्यासोबत एका अभद्र गोष्टीचे अवगुंठण दिले.      काय तर एक मुलगा असतो, त्याचं लग्न होते मगं