पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टेस्ला गं बाई टेस्ला

इमेज
  टेस्ला गं बाई टेस्ला आमच्याकडे एक बरीच जुनी मळकट कार आणि एक थोडी जुनी बेढब वॅन आहे. या दोन्हीही मी नियमित चालवत असते. पण दोन तीन वर्षात आमच्या नेबरहूडात हळूहळू सगळ्या टेस्ला दिसायला लागल्यात.   किंवा साधुसंतांना सगळीकडे जसा ईश्वर दिसतो तशा मला ह्याच दिसत असतील. मागच्या वर्षीपासून तर ड्रायव्हिंग करताना दर तीन मिनिटाला एक टेस्ला बाजूने सुळकन निघून ही जाते. आणि मला आपोआपच हीन भावना येते. कसं ते सांगायला '3 ईडियट्स' मधल्या रँचो सारखा डेमो देते. त्याशिवाय काही ही हीन भावना तुमच्यापर्यंत पोचणार नाही.         शेजारशेजारच्या दोन थेटरात दोन सिनेमे लागलेत , त्याचे पोस्टर बाहेरच्या भिंतीवर लावलेय. एकात 'गहराईयां'ची दीपिका पडूकोण तर दुसऱ्यात कुठल्याही सिनेमाची काकुळतीला आलेली निरूपा रॉय आहे. कल्पना करा, निरूपांच्या सिनेमाचे तिकीट पन्नास रुपये व दीपिकाच्या सिनेमाचे हजार आहे, आणि तुमच्याकडे पंचवीस रूपये आहेत तर तुम्हाला सिनेमाला न जाताही हीन भावना येईल. शिवाय घरी येऊन टिव्ही बघावा तर एक-दोन वाहिन्यांवर 'आमची माती-आमची माणसं' लागलेलं असंल, तर जे काय मनात तया...

काही गाणी आणि आरस्पानी

इमेज
       काही गाणी आणि आरस्पानी     बन लिया अपना पैगंबर    तैर लिया सात समंदर    फिर भी सुखा मन के अंदर    क्यों रह गया    रे कबिरा मान जा....    रे फकिरा मान जा..   आजा तुझको पुकारें तेरी परछाईंया     साप जसा कात टाकतो तशी मी लिहिते,  दुसरी इतकी चपखल आणि क्रीपी उपमा याक्षणी तरी आठवत नाही. काही तरी साचल्यासारखं वाटतं , व्यक्तं झालं की मोकळं होऊन आपापल्या मार्गाला जाता येतं. सापाला त्याचाच भाग असलेल्या काती विषयी काही विशेष आसक्ती वाटत नाही पण मुक्तताही हवी असते आणि सक्तीही नको असते, तसंचं काहीसं होऊन बसतं, बहुतेक मी विचित्र आहे, माझा प्रवास आरस्पानी असावा एवढाच आग्रह आहे !     प्रवासात काही का येईना सगळी बेटंच आहेत, ध्रूवपद नाही, हे कळाल्याने बहुदा बऱ्याचशा गोष्टी 'whatever' गटात गेल्यात. भारतातून परत येऊन तीन महीने होतील, यावर वैयक्तिक न होता लिहावं असं वाटलं. पण पझलचे हजारो तुकडे एकदाच अंगावर पडल्यावर कसं लिहिणार. जे मलाच कळत नाहीये ते कसं बांधणार, वाचणाऱ्याला ...