पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्हेज ग्रीन थाई करी

इमेज
  पूर्वतयारीचा वेळ:  ३० मिनिटे प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १ तास लागणारे जिन्नस:  करीच्या वाटणासाठी : २ पेरं ओली हळद, ४ पेरं गलांगल(थाई आले),दोन काड्या लेमनग्रास, ५-६ हिरव्यागार मिरच्या, प्रत्येकी चमचाभर पांढरे मिरे, जिरे, धने, ७-८ कोथिंबीरीच्या काड्या, २-३ सांबारचे कांदे, ६-७ पाकळ्या लसूण, एका पूर्ण केफिर लाईमची सालं (पांढरा भाग न येऊ देता). बाकीचे : १ लिटर नारळाचे दूध, मशरूम, मध्यम आकारात चिरलेली- प्रत्येकी अर्धी वाटी लाल-हिरवी शिमला मिर्ची , ब्रॉकोलीचे तुरे, गाजराच्या चकत्या, बाळ कणसं,थाई बेझिलची ५-६ पाने क्रमवार पाककृती:  क्रमवार पाककृती * १. वाटणाचे घटक मिक्सर मधून घूरकावून घ्या. निन्जा बिनपाण्याचे करत नाही म्हणाले, म्हणून अर्धीवाटी पाणी घातले. त्यात माझी लेमन ग्रास जून/निबर निघाली, त्यामुळे थोडे जास्तच फिरवले. आर्टिफिशय इंटलेक्टचे निन्जा लईच आगाव हाय, चटणी झाली समजून मनानंच कुटणं थांबवतं. त्याला खवट सासू नव्या सुनेला ज्या प्रेमाने समजावते तसं किंवा 'मोटा शाणा झाला का बे' म्हंणत, ओव्हरराईड करत ओल्या नारळाच्या चटणीसारखी चटणी करून घेतली. * संज्याेतनी गलांग...