कबिरास पत्र
मराठी भाषा गौरव दिन २०२३ निमित्त स.न.वि.वि. या उपक्रमात भाग घेतला होता, त्यात कुणालाही पत्ररूपी लेख लिहायचा होता. यावर्षी मी म भा गौ दि निमित्ताने मायबोलीवर संयोजनातही भाग घेतला होता. प्रिय कबीरा, तुला काही कल्पना नाहीये इथे काय चाललंय , त्याने माझ्यासारख्या किती जणांचा गोंधळ होतोय. ज्यांना आत्मशोधाची जिज्ञासा आहे त्यांची दिशाभूल करायला इथे सर्वस्व वेचणारी लोक आहेत. असत्याबाबत केवढी एकनिष्ठता, आणि सत्याशी म्हणजे तुझ्या कैवल्याशी काही देणेघेणे नाही. आजकाल आस्तिक कोण नास्तिक कोण कळत नाहीये. बहुतांश जनता इतकी मूर्ख - व्यक्तिपूजक आहे की One Sadguru goes another comes ! सारासार कळणाऱ्यांना तूही असाच असला पाहिजेस असं वाटतं, न कळणाऱ्यांना तुला जाणूनच घ्यायचे नाही. हे म्हणजे अर्धे आंधळे व उरलेल्यांच्या डोळ्यावर पट्टी अशी अवस्था आहे. आता महाभारत झालं तर काय नवल..! त्यांना जीव तोडून सांगायला माझ्याकडे कसलाही पुरावा नाही , माझं काय मी आज आहे उद्या नाही पण तू तर चिरंतन आहेस, तुला काहीच कसं वाटत नाही. दिसामागून दिसं चाललेत, जे आहे त्याला साक्षात्कार का मानू मी तरी! 'तेरे बिन खाली आजा खा...