ऑपनहायमर

 ऑपनहायमर....



ऑपनहायमर बघून आले, सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. व्यक्तिशः भूतकाळ-वर्तमानकाळ अशा कथेतल्या उड्या मला त्रासदायक वाटतात. तरीही समजला .

आईनस्टाईनचे पात्र मुद्दाम डिटॅच वाटले.त्याच्या सापेक्षता सिद्धांताच्या पुढची पायरी म्हणावे असं हे संशोधन होते.
त्यामुळे पुढं काय होऊ शकते याची त्याला जाणीव असल्याने तो त्रयस्थ दाखवला असावा.

एफबीआईने ऑपनहायमरला देशद्रोही ठरवतानाचा कोर्टरूम ड्रामा भलता लांबला आहे. मला हिरोशिमा आणि नागासाकी मधला हल्ला दाखवतील असं वाटलं होतं पण न्यू मेक्सिको मधली चाचणी तपशीलवार दाखवली आहे. नंतर फक्त डॉ ऑपनहायमर यांच्या हावभावावरून घटनेची तीव्रता पोचवली आहे. तो असह्य ताण किलियन मर्फीने फार चित्रदर्शी दाखवला आहे. सुरवातीला दिसणारी निरनिराळे दृष्टांत/ व्हिजन्स याने तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे लक्षात येते. मॅट डेमन मला ओबडधोबड वाटतो पण इथे सूट झालाय. दोन्ही नग्न दृश्यं थोडी अनावश्यक वाटली व तेव्हाच गीतेतले संहारावरचे श्लोक म्हणायचे प्रयोजन कळले नाही. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचं कामही अप्रतिम झाले आहे. तो मला आवाजावरून ओळखायला आला, इतकं बेमालूम जमलं आहे.

स्त्रियांना विशेष कामच नाही. त्याकाळी असंच असायचं बहुतेक. एक केमिस्ट्रीची ग्रॅज्युएट असिस्टंट, एक प्रेयसी व एक बायको आहे. बाकी इथून तिथून सगळी महत्त्वाची माणसं पुरुष आहेत.

एमिली ब्लंटने(बायको-किटी) चांगले काम केले आहे. प्रेसिडेंट ट्रूमन त्याला "रडके बाळ" म्हणतो तो सीन व एकंदर गिल्टमुळं कुठेतरी स्वतःलाही नृशंस संहारासाठी जबाबदार मानायला लागतो आणि आपल्या विरोधात साक्ष देणाऱ्यांचा त्याला रागही येत नाही.. तो काहीसा नम्ब होतो, हे फारच चपखल दाखवले आहे. प्रेयसी Florence Pugh ही नटी आहे, छोट्याशा रोल मधे ती फार जबरदस्त वाटते. जी नग्न दृश्यं आहेत ती हिच्यासोबतच आहेत, इंटेन्स आहेत.

स्वत्व शोधताना जी ecstasy येते, ती त्याला फिजिकल इंटिमसी मधे गवसते, गवसली असावी. एकदा (दृष्टांतात/व्हिजन्स) सहस्ररश्मीचा प्रकाश दिसलेली व्यक्ती परत कधीही नॉर्मल होऊ शकत नाही, कारण स्वत्वाचा शोध बाकी सगळ्या जिज्ञासांवर मात करतो. नंतर एकेकाळी तिच्यात मनाने गुंतलेला तो प्रयासाने बाहेर पडतो, ती मात्र त्याच्या आत्मशोधाच्या प्रवासातले collateral damage ठरते. ते त्याच्या डोळ्यात त्याने बायकोपुढे कबूल करताना दाखवलंय. तुम्ही पॅशनला दाबू शकाल पण कॉलिंगला नाही दाबू शकत. त्याच्या अंतर्मनात आधीही कित्येक अणूस्फोट झालेत , परिस्थितीने व आत्मचिकित्सेने- ग्लानीने त्याच्या मनाचा सर्वनाश झाल्यावर त्याला ध्रुवपद गवसलंय , फना..... तर ही प्रेयसी त्या प्रवासातली एक महत्त्वाची (though short lived ) व्यक्ती आहे.

भगवद्गीतेतले संहारावरचे श्लोक वेगवेगळ्या क्षणी उद्धृत केले आहेत. एकदा चाचणी यशस्वी झाल्यानंतरच्या जल्लोषात व अजून एकदा शेवटी दाखवलं आहे. पण हे भगवद्गीता हातात धरून वाचत %*#$ केलेलं दाखवलं आहे. ही खाजगी दृश्ये तर काल्पनिक असतात, त्यामुळे याचं प्रयोजन कळलं नाही. मला आक्षेपार्ह वगैरे वाटलं नाही पण , is that really a right time to do this असं मात्र वाटलं.

प्रमिथियसची* गोष्ट सुरवातीला गडबडीत वाचली होती. तिचा वापर ऑपनहायमरची कथा ज्या चरित्रावर आधारित आहे, त्याला श्रेय देत (ग्रीक) रूपकासारखा केला आहे. तरीही ऑपनहायमर निरागस वाटत नाही, आपल्या आत्मविश्वासाची, पॅशनची - आंतरिक ऊर्मीची किंवा जबरदस्त कॉलिंगची सांगड घालताना जो विध्वंस होणार आहे याची त्याला नेहमीच कल्पना होती, ते आऊटकम नीतिमूल्याशी अलाईन होत नाहीये म्हणून तो गोंधळलेला आहे. मग त्या हायरपावरवर ते सगळं कर्म सोपवून तो heal होतो हळूहळू.

मी काही सिनेमाविषयी इतकं खरंतर काहीच वाचलं नव्हतं एक डॉक्युमेंटरी सुरू केली होती ती max ने अचानक काढून टाकली. आयमॅक्स नसल्याने की काय बरेचसे संवादही muffled वाटले होते. बरेच संदर्भही नवीन होते, शिवाय तीन तासांचा असूनही ऑपनहायमरचं सगळं आयुष्य त्यात बसवल्याने तो lot to process होऊन जातो. ओटीटीवर आल्यावर पुन्हा बघेन, पुस्तक वाचण्याची शक्यता नाहीचे. पुस्तक न वाचता सिनेमा बघितल्यावर सिनेमा पूर्ण कळत नाही, पुस्तक वाचून सिनेमा बघितला की सिनेमा अर्धवट वाटतो असा अनुभव आहे. पुस्तक मागवलं आहे, मुलाचं झालं की वाचेन कदाचित.

(हा प्रतिसाद विस्कळीत वाटणार आहे, कृपया चालवून घ्या. )

भगवद्गीतेतले संदर्भ -
https://www.openculture.com/2020/09/j-robert-oppenheimer-explains-how-he...

प्रमिथियसची गोष्ट -
https://en.m.wikipedia.org/wiki/Prometheus#:~:text=Prometheus%20is%20bes....


चित्र, प्रताधिकार मुक्त सौजन्य शटरस्टॉक.
https://www.maayboli.com/node/83338?page=25


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हृता

बंदिवान मी ह्या संसारी