Indiana Jones and the dial of destiny





Indiana Jones and the dial of destiny
चांगला आहे. लोकांना अतिशय वगैरे आवडतोय यात नॉस्टॅल्जियाचा भागच जास्ती असावा. स्वतंत्र कलाकृती म्हणूनही बरा आहेच, तरी काही ठिकाणी क्रिंज वाटत रहातो. हॅरिसन फोर्ड 'अवघे पाऊणशे' वयमान असूनही फार चांगला दिसतो. बांधा अजूनही उत्तम. पहिल्या अर्ध्या तासात नाझींना इतिहास बदलण्यासाठी आर्किमिडीजचे ते डायल किंवा टाईम मशीन हवे असते, त्यात AI ने चेहरा तरूण केलेला इन्डी एकदम ग्लोईन्ग कधी खरा कधी खोटा वाटत होता. पण स्पीलबर्गने जे काही होतं ते सफाईदार दाखवलं आहे. कथेचा काळही साठच्या दशकातील आहे. बरेच निरपराध लोक मरून हे पाचव्या मिनिटाला चिल करतात, खासकरून त्याची यातली जी गॉड डॉटर आहे ती. जरा जास्तच कूल आहे ती. ॲन्टोनिओ बॅन्डॅरस दिसला छोट्या रोलपुरता. क्रश होताच एकेकाळी, आता मला ओळखायला आला नाही.

शेवटी गुहा, पोर्टल, नेहमीचे जाळं, पाण्यात पडून प्रवाहासोबत जाऊन योग्य ठिकाणी धडकणं वगैरे करत काळप्रवास करून परत येतात. सुरवातीला अंडरग्राऊंड सबवे ट्रॅक्सवरून यावयात घोडा घेऊन 'टुगडुक-टुगडुक' केलेलं आहे. नुसतं टुगडुकच नाही तर प्लॅटफॉर्म वरून ट्रॅक वर, या ट्रॅकवरून त्या ट्रॅकवर घोड्यासहीत वेड्यावाकड्या उड्या मारलेल्या बघून थोडं अ आणि अ आणि जुना चार्म/नॉस्टॅल्जिया टिकवण्याचा आटापिटा वाटला. पहिला अर्धा तास रेंगाळतो व नंतर पकड घेतो. एकुण चांगला आहे. सोबत एक छोटा मुलगा व एक तरूणी यांचा नियम पाळला आहे. हे कथानक अडकलं आहे, नेहमी काळाच्या मागचे उत्खनन असते. त्यामुळे थोडं जुनाट वाटतं. याच जॉन्राचे
लारा क्राफ्ट वगैरे सारखे सिनेमे यामानाने मला उजवे वाटतात. हा डोरा द सिटी ऑफ गोल्ड व लारा क्रॉफ्ट यांच्या मध्ये कुठेतरी येतो.

आमच्या मागे बसलेला ज्येनांचा ग्रूप साध्या विनोदावरही खूप हसत होता, हळवं होऊन अमेरिकन ऑऽऽ करत होता व शेवटी तर टाळ्या वाजवल्या हे बघून आमचाही काळप्रवास झाला. हॅरिसन फोर्ड क्रश असावा.


Copyright free image from copyright.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता