The fall of the house of Usher

 'Maybe' Spoiler alert****



नेटफ्लिक्सवर The fall of the house of Usher बघितली. एडगर ॲलन पो यांच्या संकलित गूढ कथांना एकत्र करून तयार केलेले कथानक व Mike Flanagan याचं दिग्दर्शन आहे. प्रचंड खिळवून ठेवणारी, अनप्रेडेक्टिबल, गूढ, कुठंकुठं अभद्र आणि भयंकर आहे. सर्वांची कामं जबरदस्त झाली आहेत. एका अनौरस बहिणभावांवर- Madeline Usher आणि Roderick Usher झालेला अन्याय, जिजसवर अंधविश्वास ठेवून औषधं न घेता तिळातिळाने झिजून मरणारी आई, माणुसकी नसलेले वडील, समाजात नसलेले स्थान -अशी पार्श्वभूमी असलेले ते दोघे अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. त्यात बहिणीचे पात्र अतिशय धूर्त , मतलबी व बुद्धिमान आहे. वैचारिक स्पष्टता असलेले नकारात्मक स्त्री पात्र खूप दिवसांनी बघायला मिळाले. तिनं अमेरिकन आयुष्यावर व त्यातील औषधी कंपन्यांच्या गुंत्यावर बोलून दाखवलेलं भाष्य तर फारच चपखल वाटलं.

३१ डिसेंबरला रात्री एका समांतर विश्वात असलेल्या पबमधे जातात, तिथल्या मृत्यूदेवतेला(Metaphysical -gothic entity) स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काही वचनं देऊन बसतात. नंतर बाहेर येऊन हे गूढ ते विसरून जातात. त्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षांनी कथानक सुरू होते.

सुरवातीला कविमन असणारा भाऊही तिचं ऐकतऐकत मोठे मोठे न पटणारे निर्णय घेतो. एका वेदनाशामक औषधामुळे ते संपूर्ण फार्मास्युटिकल कंपन्यांवर अधिराज्य गाजवतात. त्यासाठी सामदामदंडभेद- जे योग्य वाटेल ते करतात. तत्वांच्या व्याख्या ह्या सोयीने मुरड घालण्यासाठी असतात, यावर त्या बहिणीचा पूर्ण विश्वास आहे. तिचा स्त्री म्हणून स्वतंत्र संघर्षही भावापेक्षा तापदायक आहे, त्यामुळे ती अधिक बधिर व खंबीर होत जाते. दोघे कुठल्याकुठे जाऊन अतिश्रीमंत होतात, मग वचनपूर्तीची वेळ येऊन मृत्यूदेवता एकेका वंशजाला-एकेका अशरला त्यांच्या कर्माप्रमाणे मृत्यू देऊन आपलं कार्य कसं करते ते प्रत्येक एपिसोडमध्ये एकाच्या मृत्यूने दाखवले आहे. जबरदस्त आहे. नक्की बघा.वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव : भाग २

हृता

ऑपनहायमर