Can you hear the music!

 



वैधानिक इशारा* जड-आध्यात्मिक लेख आहे, परत फिरा. Happy

डेकार्टच्या मते आपण विचार करतो म्हणून आपण 'असतो', I think therefore I am ! पाश्चिमात्य तत्त्वज्ञान कुठेतरी विचारांतच अडकून पडले आणि पौर्वात्य त्यामानाने कितीतरी पुढे 'निर्विचारी' अवस्थेत गेले. अद्वैतवाद हा त्याहीपुढे जाऊन आत्म्याचे खरे रूप दाखवतो. त्यामुळे ज्यांना खऱ्याखुऱ्या अध्यात्माची ओळख हवी आहे, त्यांना जगभर फिरून पुन्हा घरी परतावेच लागते. पण फिरावंही लागतं , कारण इतर संस्कृतीतील अध्यात्मिक गूढ हे आपल्या आयुष्यातही टप्प्यांसारखे येतच असते.

एका भटक्यानी एकदा बुद्धाला थेट विचारलं , 'परमात्मा' अशी काही गोष्ट खरोखरच अस्तित्वात असते का ? बुद्धाने उत्तरादाखल मौन धारण केले. कारण कुठलंही उत्तर दिलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्रज्ञेच्या प्रांतात येणाऱ्या गोष्टी ह्या त्या अनुभूती दरम्यानच अस्तित्वात असतात. जेव्हा आपण त्याला काही तरी नाव देत असतो ती अनुभूती नष्ट होत असते. जरा-व्याधी-मृत्यू यांच्यापासून अलिप्त असणाऱ्या तेजस्वी परमतत्त्वाला बौद्धप्रणालीत 'तथागत-गर्भ' असेही म्हणतात.

एखादी गोष्ट गूढ असली की आपण आपल्या सोयीसाठी त्याला पटकन नाव देऊन व्याख्येत अडकवतो. मग आपल्याला फार खोलात जायची गरज पडत नाही. त्यामुळे 'ब्रह्म' आणि 'भ्रम' एकदाच प्रकट झाले आहेत असंही म्हणता येईल. सुरवातीच्या संशोधनानुसार आपले ब्रह्मांड हळूहळू आकुंचन पावत जाईल असे गृहितक होते. पण प्रत्यक्षात बिग बॅन्ग(विश्वनिर्मिती) नंतर ते प्रसरण पावत चालले आहे. भौतिकशास्त्रातल्या थेअरीजपेक्षा कितीतरी अधिक वस्तुमान अस्तित्वात आहे. त्यामुळे आपल्या कल्पनेच्या पकडीत न आलेले जे वस्तुमान आहे, ती अशी ऊर्जा आहे ज्याने विश्वाच्या चेतासंस्थेसारखे प्रत्येक जड-सूक्ष्म अस्तित्वाला धरून ठेवले आहे. ही ऊर्जा कालातीत(timeless) आणि अ-मितीय(dimensionless) आहे. या ऊर्जेने सगळ्या दृष्यादृष्याला जोडले आहे. हे तेच 'नादब्रह्म' आहे, जे सर्व आध्यात्मिक अनुभवाच्या मूळाशी आहे. ज्या नादब्रह्माच्या लहरींवर हे ब्रह्मांड श्वास घेते, तोच प्रत्येक धर्माचा कणा आहे. ह्याच नादब्रह्माचे अवकाश आपल्या आत आणि बाहेर आहे. ह्या नादब्रह्माचा शोध घेण्यासाठी अनेक योगी, साधू, शमन, लामा यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

वैदिक परंपरेतील मिथकानुसार यालाच 'इंद्रजाल'ही म्हटले जायचे. कारण इंद्र हा पृथ्वीचा राजा. ह्याच्या कृपेने पाऊस पडतो, ह्यानेच सूर्याला जन्म दिला. त्याच्यामुळे सृष्टी निर्माण झाली. याने पाडलेल्या पावसाच्या दवबिंदूत एका नव्या सृष्टीचे प्रतिबिंब पडते. सर्व दवबिंदूंचे प्रतिबिंबही एकाचवेळी एकमेकांवर पडते, त्यामुळे अनंतसृष्टींचा आभास निर्माण होतो.

Indrasnet.jpg
#Indra's net of jewels विकी

अवकाश(ether?) ही अशी पोकळी आहे की ज्यात पंचमहाभूतांचे अधिष्ठान झाल्यावर त्याला एक जड- अस्तित्व येते व नादाने त्यात चैतन्य निर्माण केले जाते. त्यामुळे त्याला काही ठिकाणी yin and yang किंवा शिव(शून्यता) आणि शक्ती(ऊर्जा) म्हटले आहे. 'अवकाश' आणि 'नादब्रह्म' या संकल्पनांना समजण्यासाठी फ्रॅक्टल हा आकार उदाहरणादाखल घेऊ. Fractal हा एक गुंतागुंतीचा भूमितीय आकार आहे, यात दरवेळी एक पूर्ण आकार व नव्या आकाराचे बीज दिसते. प्रत्येक आकारात आणखी एक आकार असं ते अविरत अनंतापर्यंत उकलत जातं. प्रत्येक आकार हा एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद असतो. ज्याच्या वापर पुरातन वास्तूकलेत आणि मूर्तिकलेत बुद्धप्रतिमा घडवण्यासाठी केला जायचा. पीठ पाण्यात कालवून सरबरीत भिजवले व त्याला एका भांड्यात घातले व त्या भांड्याच्या काठाला tunning fork पुन्हापुन्हा आदळला तर ते पातळ पीठ वर उडून विशिष्ट आकार घेईल. तसाच या नादाने आपल्या अवकाशाला तात्पुरता स्थूल-आकार दिला जातो.(Timeless world of waves and the Solid world of things.) ज्याला नाव नाही त्याला नाव देऊन, जे सतत बदलत असतं त्याचा काळ निमिषार्ध थांबवून आपण आपल्या दृष्टीने त्याला 'स्थूलत्व' देतो. For our perception defining to exist by imagining a solidity??

EXTREME1.gif
#Fractal साभार विकी.

अगदी विश्वाच्या प्रारंभी बिंदूचा महास्फोट झाला तेव्हा तो बिंदू अतिशय घन -सूक्ष्म होता, त्यापासून म्हणजे त्या अद्वैतापासून- singularity पासून हे बिंदूकण भौतिकदृष्ट्या 'द्वैत' झाले. ह्या द्वैतावस्थेआधी जे होते, ते ज्यु आणि ख्रिश्चन धर्मात 'लोगोस' किंवा हिंदू धर्मात 'आद्य ओमकार' असे मानले जाते. 'कुन फाया कुन' या सूफी गाण्यातही 'जब कुछभी नहीं था, वही था वही था' सांगून तेच समजावले आहे. बायबलमध्ये ह्याला In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God” (John 1:1). This one verse establishes the Word as being both divine and eternal in nature असे विशद केले आहे. जे काही पवित्र व चिरंतन आहे ते हे 'नादब्रह्म'. ज्यापासून सगळं अस्तित्वात आलं ते हे 'नाम', आवाजाला शब्दात बांधणं कठीण आहे, त्यामुळे 'नाम' ही व्याख्या सुद्धा मर्यादित आहे . कदाचित यामुळेच गौतम बुद्धांनी मौनाने उत्तर दिले असावे.  Happy

-अस्मिता
मला पूर्ण समजलं आहे असं नाही पण बहुतेक थोडं कळलं आहे. अमर्याद गूढाचं अशक्य स्पष्टिकरण द्यायचा मनापासून प्रयत्न केला आहे. Happy
त्यातही माहितीपट इंग्रजीत असल्याने मला मराठीत कितपत समजवता आले शंकाच आहे. जिथे शक्य नव्हतं तिथे इंग्रजीतच लिहिलं.

संदर्भ-
१. Inner worlds outer worlds माहितीपट. नक्की बघा. वरचा लेख त्याचाच परिचय आहे ‌, ह्या मालिकेत अजूनही माहितीपट आहेत. तिथे आकाश हा शब्द ether साठी वापरला , तो मी 'अवकाश' केला.
https://youtu.be/aXuTt7c3Jkg?si=i2Zs7IsmLlzuYAqm
https://awakentheworld.com/series/inner-worlds-outer-worlds-series/

२. "Can you hear the music" हे शीर्षक 'ऑपनहायमर' चित्रपटामधील पार्श्वसंगीतावरून दिले आहे, जे नादब्रह्मासाठी चपखल वाटले. सध्या रिपीटावर आहे.
Ludwig Göransson https://youtu.be/hlos8imBu7E?si=zo49NkFgEwviWSN8

३. https://en.m.wikipedia.org/wiki/Buddhabrot


मायबोलीवरील लिंक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता