पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खरडण्यामागचे खरडणे कदाचित...

इमेज
  मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा -२०२४ मराठी: लेखन घडते कसे - उपक्रम ---------------- शाळेत असल्यापासून लिहायचे. जवळजवळ प्रत्येक निबंध स्पर्धेत पहिला नंबर यायचा. चित्रकला, संस्कृत, हिंदी, वक्तृत्व, गणित, रामायण, अभिवाचन, विज्ञान, रांगोळी, कलाकृती बनवणं सगळ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, बहुतेकवेळा नंबरही यायचा आणि सगळ्यातच रूची होती. पण लेखनात जास्त मुक्त वाटायचं. एक्स्ट्रोव्हर्ट मुलगी होते मी शाळा कॉलेजमध्ये. एकदा आंतरशालेय निबंध स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पपांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यामुळे मी एक्स्प्रेसिव्ह आहे, नाहीतर नांदेडसारख्या लहान शहरात नव्वदीच्या दशकात मुलींची तोंडं दाबण्याला 'वळण लावणं' समजायचे. पर्यायाने मला आजूबाजूला उद्धट समजण्यात यायचं.‌ नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. माझ्या जन्माआधीच ते गेले पण माझे आजोबा आणि वडील फार वेगळे आहेत. आमच्या घरी फार चांगल्या माणसांचं येणंजाणं होतं आणि श्रीमंत नाही पण तिथल्या इतरांपेक्षा चांगल्या- उच्च वैचारिक वातावरणात मला रहायला मिळाले आहे. वाड्यातल्या भिंतीतली कपाटं पुस्तकांन...