Goldfish

Goldfish हा दीप्ती नवल व कल्की केक्लां आणि छोट्या भूमिकेत रजत कपूर यांचा चित्रपट पाहिला. अतिशय सुंदर वाटला. नेहमीपेक्षा फारच वेगळा आहे. आई आणि मुलगी यांच्यातल्या ताणलेल्या नात्यावर आहे. मी सुरू केला तो फक्त दीप्ती नवलचे नाव बघून पण कल्कीचेही काम अप्रतिम आहे. आईपासून दुरावलेली मुलगी आईचा डिमेंशिया वाढत गेल्यामुळे परत येते व तिला धड काळजी घेणं जमत नाही, त्यात नात्यात प्रचंड तिढा, दुखऱ्या आठवणी, आईचं रोज काही तरी विसरून जाणं/ प्रसंगी धोकादायक वागणं. जुन्या आठवणी काढून नात्यातील दुरावा कमी करावा म्हटलं तरी आई आणि मुलीचे पूर्णपणे वेगवेगळे भावविश्व, दृष्टिकोन व मतवादी स्वभाव. आईचा नवा मित्र रजत कपूर, व शेजारी रहाणारी लोक यांच्याशी जुळवून घेणे. आईला डिमेंशिया रुग्णांच्या केअर सेंटर मधे ठेवण्याचा निर्णय घेणे वगैरे फार फार सुंदर दाखवले आहे. बॅकग्राऊंडची गाणी/ गझला व ठुमऱ्या अतिशय सुंदर आहेत. टिपिकल वृद्ध आणि तरूणाई यांच्या नातेसंबंधावर (जुनं फर्निचर - गळे काढणे, आम्हाला कुणी विचारत नाही, वृद्धाश्रमात 'सोडणे' टाईप बंबाळ करून सोडत नाही, लवलेशही दिसला नाही) नाही किंवा उगाच इमोशन...