इरादा
काल इरादा (Irada) नावाचा सुंदर चित्रपट पाहिला. यूट्यूब वर Iraada नावाचा शत्रुघ्न सिन्हाचा एक सिनेमा आहे , तो हा नाही. यात नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी, दिव्या दत्ता आणि शरद केळकर, सागरिका घाटगे आहेत. सर्वांची कामं फारच भारी झालेली आहेत. पर्फॉर्मन्ससाठी पहावेत असे सिनेमे हल्ली निघत नाहीत, हाही २०१७ चा आहे. खऱ्या घटनेवर बेतलेली कथा आहे. भटिंडा येथील थर्मल- पावर प्लॅन्ट मुळे तेथील कनाल, नदी यात सोडल्याजाणाऱ्या कार्सिनोजेनिक केमिकल्स मुळे प्रत्येक घरात कॅन्सरचे रुग्ण सापडायचे. यावर काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये छापून आले होते. युरेनियमने होणारी विषबाधा, रिव्हर्स बोअरिंग, फर्टिलायझर मधून होणारी विषबाधा - या सगळ्यामुळे होणारे "इको - टेरेरिझम" यावर कथानक बेतलेय.
थ्रिलर सिनेमा आहे. नसिरुद्दीन शाह एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे, मुलीला सुद्धा एअरफोर्स मधे पायलट करायचं स्वप्न आहे. त्यासाठी तिला रोज कॅनालमधे पोहण्याच्या सरावासाठी घेऊन जातो जेथे हे केमिकल्स सोडलेले असतात. ते पाणी नाकातोंडात जाऊन ती तडकाफडकी कॅन्सरने मरून जाते. तेथूनच सगळा प्रतिशोध सुरू होतो. शरद केळकर या थर्मल प्लान्टचा मालक/ खलनायक आहे. त्याने पॉलिटिशियन्सना आणि मिडीयाला विकत घेतलं आहे. दिव्या दत्ता एक क्रूर आणि उद्धट पंजाबी पॉलिटिशयन आहे. अर्शद वारसी पोलिस निरीक्षक आहे. पावर हाऊस पर्फॉर्मन्सेस आहेत. शरद केळकर एकदम टॉल, डार्क, हॅन्डसम+ व्हाईट शर्ट घालावे तर यानेच असा व्हिलन दिसलाय. सहसा प्रतिमा जपण्यासाठी लोक पांढऱ्याशुभ्र रंगाचे कपडे घालतात. त्यामुळे याला बहुतेक कपडे तसेच दिलेत.
अर्शद वारसी एकदम नॉर्मल पोलिस आहे, सिंघम नाही. सागरिका घाटगे जर्नलिस्ट आहे. नसिरुद्दीन शाहच्या तोंडून येणारी शेरोशायरी व पंजाबी गाणी सुंदर आहेत. पंजाबी असूनही लाऊड नाहीत, लोकगीतांसारखी वाटली व पार्श्वभूमीवर ऐकू येतात. नसिरुद्दीन शाह याच्या मुळाशी कसा जातो व अर्शद वारसी आणि तो वारंवार यामुळे एकत्र येत जातात. नंतरचा ट्विस्टही भारी आहे, येथे लिहीत नाही. या दोघांची केमिस्ट्री इश्किया आणि देढ इश्किया पासून भन्नाट वाटली आहे. अभिनय करतात असे वाटतच नाही. येथेही सिरियस रोल्स असूनही तेच इक्वेशन दिसते. यूट्यूब वर आहे. बघून बघा. अजिबात टिपिकल नाही. नेहमीच्या थ्रिलर सारखा वेगवान नाही पण यात एक 'ठहराव' आहे, ज्यामुळे तो विचारप्रवर्तक वाटतो.
"एरिन ब्रॉकोव्हिच" या ज्युलिया रॉबर्ट्सच्या सिनेमाची आठवण आली पण साम्य असं काही नाही या दोन्हींमधे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा