चित्रपटांच्या संदर्भ लिंक
धडक २ https://www.maayboli.com/node/87006?page=26 अतिशय संयत हाताळणी आहे त्यामुळे जास्त आवडला. त्यातला जातीपातीचा भाग गृहित न धरताही कलाकृती म्हणून सुद्धा व्यवस्थित मांडणी असलेला वाटला. कितीही प्रक्षोभक आणि भडक करता आला असता पण मग इतका नेमका पोचला नसता असेही वाटले. संवेदनशील मनाची कथा आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणाऱ्यांची व जग चांगले असू शकते आपण आपलं शिकून मोठे होऊ याविचारांचा थोडा भाबडा व प्रामाणिक नायक आणि नायिका आहेत. तृप्ती दिमरीला अगदी सटल मेकप आहे, कुणीही ग्लॅमरस दाखवलं नाही. संवादही प्रवचनासारखे न वाटता योग्य अनुषंगाने आलेले वाटतात. आवेश नसूनही डोळ्यात पाणी येणाऱ्या घटना आहेत. माहितीपट पण जरा व्यावसायिक असं म्हटलं तरी चालेल. माझा आता कसल्याही समानतेच्या काल्पनिक नंदनवनावर किंवा "असं कुठं असतं का, मी तर कधी केलं नाही, पाहिलं नाही" - इत्यादी वर विश्वास नाही. People are generally mean and insecure, they can do anything for anything असं हल्ली वाटतं. त्यामुळे ह्या वर माझा सहज विश्वास बसला, अर्थात हाताळणी अतिरंजित नाही हे ही मोठं कारण आहे. अति केले की कथा न पोचता आपण...