पोस्ट्स

कथा-कादंबरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण

इमेज
  कृष्णडोहाच्या पैलतीरी ** प्रथम चरण. कथा क्रमशः आहे. ( मुखबंधन : ही एक काल्पनिक कथा आहे. राधाकृष्ण यांच्या कित्येक कथा प्रचलित आहेत. पण गोपींच्या कथा फारशा ऐकिवात नाहीत. शरद पौर्णिमेच्या रासाच्या खेळापुरतेच त्यांचे जनमानसातले स्वरूप सिमीत आहे. सर्वच गोपगोपी कान्हावर जवळजवळ तितकेच प्रेम करायचे असे मला वाटते म्हणून ह्या काल्पनिक गोपीला नायिका करून मी कथा लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य गोष्टींचा आदर रहावा तरीही काल्पनिक गोपीला सुद्धा न्याय मिळावा म्हणून त्यांचे आपसातले कमीत कमी संवाद कथेत येऊ दिले आहेत. ही खूप साधी सहज कथा आहे. मी स्वानंदासाठी लिहिली आहे आणि वाचून तुम्हालाही आनंद मिळावा एवढा सरळ हेतू आहे. काही संस्कृत शब्द पर्यायी म्हणून वापरले आहेत. गरज लागल्यास शब्दांचे अर्थ खाली दिलेले आहेत. धन्यवाद !!  ) ************** "आपल्याला उद्या पहाटे पहिल्या प्रहरी  वृन्दावनी निघायला हवे पुत्री ! " "नाही तात मला , मला इथेच रहायचे आहे , आपल्या या वाड्यात मातेच्या कित्येक स्मृती आहेत , त्याचा वियोग मला सहन नाही होणार ". "बाळ नारायणी, मी समजू शकतो गं. तू एकुलती एक पुत्