सिब्लो निसर्ग केंद्रास भेट

 



टेक्सासच्या उल्कापात वाटावा अशा उन्हाळ्यात इथे गार वाटते म्हणून आम्ही नियमितपणे जातो.सिबलो निसर्गकेंद्र हे अजिबात प्रसिद्ध नाही पण इथे तास दोन तास फिरायला प्रसन्न वाटते. शाळेच्या अधूनमधून येणाऱ्या सहली आणि पाच दहा पक्षीमित्र सोडले तर इथे विशेष कुणी येत नाही. कधी कधी फोटो शूट चाललेली दिसतात. त्यामुळे नेहमीच निवांत , शांत असते. घराजवळ असल्याने मलाही सुटसुटीत वाटते.

याचा आम्ही खूप दिवस विचित्र उच्चार करायचो. Cibolo आहे तर सिबोलो/ किबोलो/चिबोलो / सायबलो पण प्रत्येक वेळेला मुलाने चूक काढली. आमच्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची accents आहेत. तोच फक्त मराठी मराठी उच्चारात आणि इंग्रजी अमेरिकन उच्चारात बोलू शकतो. मुलीचे तर उलट झाले आहे असे चिडवतो  , तर त्याने आम्हाला योग्य उच्चार शिकवला तो म्हणजे सिब्लो , हे 'ब' अर्धही नाही आणि पूर्ण पण नाही. तर ह्या नेटीव अमेरिकन / इंडियन 'सिब्लो' शब्दाचा अर्थ आहे टेक्सासची म्हैस अर्थात बायसन.




Though the terms are often used interchangeably, buffalo and bison are distinct animals. Old World “true” buffalo (Capebuffalo and water buffalo) are native to Africa and Asia.  Bison are found in North America and Europe. Both bison and buffalo are in the bovidae family, but the two are not closely related.

आपल्या म्हशीशी यांचा काही संबंध नाही असे विकिपीडिया सांगते.
म्हैस नाव असलेले हे निसर्गकेंद्र रमणीय आहे बरं का. पण खास यावे इतके खास नाही.
तर आम्ही रहातो ते एक जर्मन वसाहतीने वसवलेले छोटे टुमदार गाव आहे. बरीच अमेरिकन कुटुंब मूळची जर्मनीतुन इथे आले आहेत. साधारण १८५० च्या आसपास येण्यास सुरुवात झाली होती. उरलेली सगळी लोक मूळची मेक्सिकन/ स्पॅनिश वंशाची आहेत. इथे आल्यानंतर अजिबात नसलेली वांशिक विविधता जाणवून अस्वस्थ झाले होते. अर्धी गोरी अमेरिकन आणि अर्धी हिस्पॅनिक !! मुलाच्या शाळेत साडेतीन हजार मुलांमध्ये तो एकटाच देशी /brown / south Asian or even asian आहे आता कल्पना करू शकता .
तर या अशा छोट्या गोजिरवाण्या "बर्नी" (स्पेलींग Boerne उच्चार जर्मन असल्याने बर्नी) गावातून एक नदी वहाते तिच्या आसपास हे निसर्गकेंद्र वसवलेले आहे. या नदीचे नाव आहे सॅन अँटोनियो व तिच्या ओढ्याचे ( creek म्हणजेच ओढा) नाव सिब्लो क्रीक. आणि निसर्गकेंद्राचे नाव सिब्लो नेचर सेंटर.
पाऊस पडून गेल्यावर हिरवेगार झालेला हा परिसर टिपला होता फोनच्या कॅमेऱ्यात Happy .









































धन्यवाद.

©अस्मिता.



मायबोलीवर पूर्वप्रकाशित.


<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7883595537263568"

     crossorigin="anonymous"></script>


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12th Fail (Hindi movie)

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

हृता