श्री गणेश स्तवन ।
श्री गणेश स्तवन ।
निरानान्दमानन्दमद्वैतपूर्णम्
परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं
परब्रह्म-रूपं गणेशं भजेम
आज तुझ्या या अशाश्वत मूर्तरूपाची भक्ती व पुजन करू की तुझ्या त्या नित्य अमर्याद, शाश्वत व निराकार रूपावर प्रेम करू. मला सद्गुणांचा आशीर्वाद देणाऱ्या अरे गणेशा , मला तू दोन्ही रूपांत अत्यंत प्रिय आहेस.
चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्
मुनिन्ध्येयमाकाशारुपं परेशं
परब्रह्म-रूपं गणेशं भजेम
उमेच्या मांडीवर सोंडेशी खेळणाऱ्या तुझ्या गोजिऱ्या रूपाला पहाते तेव्हा मीच साक्षात गौरी होते. इतके लोभस रूप असताना , तुला स्वहस्ताने मोदक भरविल्याशिवाय मला कसे बरे रहावेल !
जगत्-कारणं कारण- ज्ञानरुपं
सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं
जगद्व्यापिनं विश्र्ववन्द्यं सुरेशं
परब्रह्म-रूपं गणेशं भजेम
सर्व सत्याचा, प्रार्थनांचा आणि आविष्काराचा प्रकाश आहेस तू , तुझ्याशिवाय कुणाचे स्तवन करू मी !! सर्व जगातील ज्ञानाचे, प्रगतीचे , सुखांचे कलागुणांचे स्त्रोत असूनही मूळ निर्गुण निराकार असलेल्या तुला मी वंदन करते.
असाच दरवर्षी मूर्तरूपाने-मूर्तीरूपाने ये आणि माझ्या ह्रदयातील अज्ञानाचा व माझ्या जीवनातील दुर्भाग्याचा अंधःकार दूर कर , पण अमूर्तरूपातील वरदानासह माझ्या मतीत मात्र नित्य वास कर !!
।। श्री गणेशाय नमः ।।
।। शुभं भवतु ।।
*श्री शंकराचार्य लिखित गणेश स्तव .
हस्तलेखन स्पर्धेसाठी रचलेले.
ह्याची हीच चाल माझी आवडती आहे. माझी विनंती आहे की एकदा तरी ऐकाच !! तुमची गणपतीची आवडती स्तोत्रे, गाणी प्रतिसादात शेअर करा.
-अस्मिता
गणेशोत्सव २०२०
प्रताधिकार मुक्त चित्रे आंतरजालावरून साभार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा