12th Fail (Hindi movie)
12th Fail सुरेख जमलाय. खूप आवडला. विक्रांत मेस्सी ह्रितिक एवढा ग्लॅमरस नाही म्हणून त्याला टॅन करून जे तांबडं केलं आहे ते फार खटकत नाही. ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे, त्याला सर्वसाधारण दाखवणं अशक्य आहे. सुपर ३० आवडला होता. बघताना तुलना केली गेली नाही. त्याचं शरीरही किरकोळ आहे, त्यामुळे तो गिरणीत काम करताना ज्या हालचाली करतो त्या एकदम आदर्श वाटल्या आहेत. पांढरपेशे एवढे चपळ नसतात, हालचालीत चिवटपणा नसतो. आपल्याला त्यांच्या सारखं तासनतास उकिडवं बसता येत नाही, आपण मागच्या मागे पडतो. ते फार काटक असतात... ते त्याने फारच छान दाखवले आहे. पटकन भोरगं टाकून कुठंही अंग टाकतात. त्याने बाबा आल्यावर कसं झटकले तसं, मैत्रिणीलाही किती प्रेमाने स्टूल स्वच्छ करून दिला. मला त्या दोघांचे प्रेम फारच आवडले, त्या वयात जसं उच्छृंखल प्रेम असतं, त्याचा लवलेशही नव्हता. अतिशय पोक्त आणि समजदार नातं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्याने जी जिद्द, चिकाटी आणि तत्त्वनिष्ठता दाखवली त्यानं भरूनच आलं. त्याच्या मित्रांनी दिलेला सपोर्टही कौतुकास्पद, 'आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही' म्हणतो. हे कळणं किती प्रगल्भ आ...
New member growing well👍👍
उत्तर द्याहटवा