सिनेमा आणि मी: भाग २

 


'तू झूटी मैं मक्कार' आवडला नाही. हिंदी फिल्म इंडस्ट्री वरून कोणी तरी कोंबडं उतरवून टाकायची वेळ आली आहे.
पूर्ण वेळ रणबीरचे क्लोजअप आहेत. देखणाच दिसतो तो पण अति केलंय. दाढीतल्या दोन केसांमधले अंतरही मोजू शकाल. अधेमधे श्रद्धा कपूरचे क्लोजअप आहेत. फार निस्तेज दिसते, डोळ्यांवरून तर आजारी वाटते. ही म्हणजे डोळ्यासमोर असताना फार आनंद/दुःख होत नाही पण पाठ फिरवली की विसरून जाते. कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार वाटतो. Proud शेवटची एअरपोर्ट 'धमाल' अजिबात जमली नाही. टायमिंग गंडलंय. सिनेमात प्रचंड क्रिंज संवाद आहेत.' द द ठुमका' गाण्याची कोरिओग्राफी अतिशय वाईट आहे. डोहाळजेवणाला बोलवलेले दहा हजार लोक गच्चीवर व अंगणात नाचतात. सर्वांचा आविर्भाव आपण फार काही तरी मजेदार करतोय असा आहे पण प्रेक्षकांपर्यंत काही पोचत नाही. हाकानाका. रणबीर मला रॉकस्टार , अजब प्रेम की गजब कहाणी, बर्फी, ऐ दिल है मधे फार आवडला होता. आवडताच आहे तो, पण आजकाल स्क्रीनवर एनर्जी जाणवत नाही. बोनी कपूर का आहे यात, डिंपल अशात किती काम करते. ब्रह्मास्त्र, पठाण, आणि हे. Weak script, average presentation.

https://www.maayboli.com/node/83338?page=1

कठहल बघितला, आवडला. राजपाल यादव व रघुवीर यादव दोघेही आहेत या सिनेमात. त्यात रघुवीर यादवला दलालाच्या रोलमध्ये कधी बघितल्याचे आठवत नाही. सगळ्यांची कामं आवडली. सिनेमा सेक्सिस्ट व पुरूषसत्ताक मतांना हलकेफुलके धक्के देतो . तेही subtly , तलवार घेऊन नाही. ते आवडलं, चांगलं blend-in झालंय असं वाटलं.

https://www.maayboli.com/node/83338?page=5


शाकुंतलम् फार बंडल आहे. हिंदी गाणी व डबिंग मधे स्वर्गातला इंद्र व शकुंतला, दुर्वास मुनी मधेमधे ऊर्दू बोलतात. सचिन खेडेकरच्या भुवया ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी रिसायकल्ड मिशा आहेत. बघवत नाहीत. तो कण्व मुनी झाला आहे. सगळे त्याला 'कणव' मुनी म्हणण्याने आपल्याला शकुंतलेबद्दल कणव वाटत नाही.
जिवाचे हाल करून घेऊ नका. दुसरं काही बघा.

https://www.maayboli.com/node/83338?page=6

जेनिफर लोपेझचा The Mother नेटफ्लिक्सवर बघितला, खूप आवडला. भयंकर मारामारी आहे. जेलो स्वतः च एक प्रोफेशनल किलर /एक्स FBI Agent आहे. तिचे काही गुंडांशी संबंध येऊन तिला एक मुलगी होते. ती तिला दत्तक देऊन टाकावी लागते. त्या मुलीला ओलीस धरून ठेवून तिला मारायच्या वेगवेगळ्या योजना ती उध्वस्त करत लेकीला तिच्या आईबाबापर्यंत कशी पोचवते याची वेगवान कथा आहे.


Guardians of the Galaxy 3 बघितला थिएटरमध्ये. मला अजिबात आवडला नाही. Raccoon ची गोष्ट आहे. हा सतत रडत होता, कथानक मधूनच याच्या लहानपणात उडी घेत होतं. ते तर फार कंटाळवाणं झालं. काही विनोद बरे आहेत पण बहुतेक ओढूनताणून वाटतात. ही टीम अभिनयात weak आहे. दुसरे ग्रह व त्यावरले प्राणी व सगळे व्हिज्युअल्स यांमध्ये सौंदर्यदृष्टीचा ठणठणाट आहे. त्यांच्या ग्रहाचा पृष्ठभाग बघताना स्क्रीनवर पिठलं सांडल्यासारखं वाटत होतं. Marvels needs to reinvent...! फार बोअर झालं. सिनेमाचे नाव 'रडके रॅकून' हवे होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता