पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑपनहायमर

इमेज
  ऑपनहायमर.... ऑपनहायमर बघून आले, सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. व्यक्तिशः भूतकाळ-वर्तमानकाळ अशा कथेतल्या उड्या मला त्रासदायक वाटतात. तरीही समजला . आईनस्टाईनचे पात्र मुद्दाम डिटॅच वाटले.त्याच्या सापेक्षता सिद्धांताच्या पुढची पायरी म्हणावे असं हे संशोधन होते. त्यामुळे पुढं काय होऊ शकते याची त्याला जाणीव असल्याने तो त्रयस्थ दाखवला असावा. एफबीआईने ऑपनहायमरला देशद्रोही ठरवतानाचा कोर्टरूम ड्रामा भलता लांबला आहे. मला हिरोशिमा आणि नागासाकी मधला हल्ला दाखवतील असं वाटलं होतं पण न्यू मेक्सिको मधली चाचणी तपशीलवार दाखवली आहे. नंतर फक्त डॉ ऑपनहायमर यांच्या हावभावावरून घटनेची तीव्रता पोचवली आहे. तो असह्य ताण किलियन मर्फीने फार चित्रदर्शी दाखवला आहे. सुरवातीला दिसणारी निरनिराळे दृष्टांत/ व्हिजन्स याने तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे लक्षात येते. मॅट डेमन मला ओबडधोबड वाटतो पण इथे सूट झालाय. दोन्ही नग्न दृश्यं थोडी अनावश्यक वाटली व तेव्हाच गीतेतले संहारावरचे श्लोक म्हणायचे प्रयोजन कळले नाही. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचं कामही अप्रतिम झाले आहे. तो मला आवाजावरून ओळखायला आला, इतकं बेमालूम जमलं आहे. स्त्रियांना...

Indiana Jones and the dial of destiny

इमेज
Indiana Jones and the dial of destiny चांगला आहे. लोकांना अतिशय वगैरे आवडतोय यात नॉस्टॅल्जियाचा भागच जास्ती असावा. स्वतंत्र कलाकृती म्हणूनही बरा आहेच, तरी काही ठिकाणी क्रिंज वाटत रहातो. हॅरिसन फोर्ड 'अवघे पाऊणशे' वयमान असूनही फार चांगला दिसतो. बांधा अजूनही उत्तम. पहिल्या अर्ध्या तासात नाझींना इतिहास बदलण्यासाठी आर्किमिडीजचे ते डायल किंवा टाईम मशीन हवे असते, त्यात AI ने चेहरा तरूण केलेला इन्डी एकदम ग्लोईन्ग कधी खरा कधी खोटा वाटत होता. पण स्पीलबर्गने जे काही होतं ते सफाईदार दाखवलं आहे. कथेचा काळही साठच्या दशकातील आहे. बरेच निरपराध लोक मरून हे पाचव्या मिनिटाला चिल करतात, खासकरून त्याची यातली जी गॉड डॉटर आहे ती. जरा जास्तच कूल आहे ती. ॲन्टोनिओ बॅन्डॅरस दिसला छोट्या रोलपुरता. क्रश होताच एकेकाळी, आता मला ओळखायला आला नाही. शेवटी गुहा, पोर्टल, नेहमीचे जाळं, पाण्यात पडून प्रवाहासोबत जाऊन योग्य ठिकाणी धडकणं वगैरे करत काळप्रवास करून परत येतात. सुरवातीला अंडरग्राऊंड सबवे ट्रॅक्सवरून यावयात घोडा घेऊन 'टुगडुक-टुगडुक' केलेलं आहे. नुसतं टुगडुकच नाही तर प्लॅटफॉर्म वरून ट्रॅक वर, या ट्रॅ...