मी का वाचते ??





आपण जे काही वाचतो, अगदी काहीही.... ते आपण स्वतःतल्या 'न जगलेल्या' , 'न अनुभवलेल्या' आयुष्यासाठी वाचत असतो. वैचारिक लेखन वाचण्यामागे तर लेखक सांगतोय त्या मनाच्या प्रतलात जाण्याचीच धडपड असते. जिथे एरव्ही आपल्याला involuntarily जाता येत नाही, कुणीतरी न्यायला लागतं. त्यामुळे हा प्रभाव फार काळ टिकत नाही. मगं आपण अजून वाचतो...अजून वाचतो....  हे विष  साधेसुधे नाही 'हलाहल' आहे. ज्या वेळी स्वतःला आपापले तिथे जाता येईल तेव्हा हे गूढच संपून जाईल. हॉलीवुडचे नट कसे म्हणतात, I do my own stunts, तसं I create my own हलाहल. दुसऱ्याच्या अनुभवाची खोली वाचणे व स्वतः ते अवकाश अनुभवणे असा फरक आहे. मगं आपले highs हे अजून higher आणि lows हे अजून lower मागतात आणि कौटुंबिक तेलकट चण्याफुटाण्यात मन रमत नाही/ किक बसत नाही. हे माझं 'मी (वैचारिक) का वाचते? ', यावर शोधलेलं उत्तर आहे. ते चूक/बरोबर असं काहीही नाही, फक्त निरिक्षण आहे. 


   मी का वाचते/वाचायचे सांगते. तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या मला एकसंध होण्याची धडपड होती. त्यामुळे कुठे तरी आपले दुवे शोधत वाचायचे. प्रत्येक पुस्तकात आपले दुवे सापडतील असं नाही मग कधीतरी एखादा तुकडा मिळाला की चंद्र गवसल्याचा आनंद व्हायचा. अखंड होण्याचा ध्यास म्हणजे वाचन आहे माझ्यासाठी. माझ्या अखंडात पूर्ण ब्रह्मांड येतं, पण फक्त माझं पर्सनल ब्रह्मांड.. !


Copyright free Image from Shutterstock.

© अस्मिता 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता