बार्बी - इंग्रजी चित्रपट
आपल्या प्रि-टीन आणि टीन मुलींसोबत सोबत आवर्जून बघावा असा सिनेमा आहे. गर्ली सिनेमा आहे असं वाटून मुलगा आला नाही घरीच 'जोकर' बघत बसला, मग मला पश्चात्ताप झाला की त्यालाही न्यायला हवे होते. कारण छुप्या पुरुषप्रधान संस्कृतीचा अवेअरनेस सगळ्यांनाच यायला हवा. काही काही विनोद वरून वरवरचे वाटतात पण त्याचा अर्थ खूप प्रोफाऊन्ड आहे. मार्गॉट रॉबी व रायन गॉसलिंग* दोघांनीही खूप छान काम केले आहे. दोघेही अतिशय सुंदर दिसतात, कधीकधी खोटे वाटतात पण त्यांचं खोटं वाटणं सुद्धा खरं वाटणं आहे. भावलाभावली आहेत नं .
America Ferrera व तिच्या मुलीचं नातं खूप नॉर्मल आणि रिलेटेबल आहे, फार छान काम केले आहे त्यांनी. तिचे व बार्बीची जनक* रूथ हिचे त्यातले प्रोलॉग खूप चपखल वाटले. डोजोमोजोकासाहाऊस वगैरे पंचेसही सही जमलेत. शेवटची पंधरा मिनिटे कथानकावरची पकड सुटली आहे. शिवाय मला केनांचं गाणं कंटाळवाणं वाटलं. शॅन्गचीचा हिरो यात दुसरा केन आहे. तो नाचतो व दिसतो छान. अनेक केन व अनेक बार्बी आहेत. ही गोष्ट stereotypical Barbie ची आहे. आमच्याकडे यातली बरीचशी खेळणी होती अजूनही आहेत, आम्ही त्याचीही आठवण काढली. मला फार आवडला सिनेमा, बार्बी विषय व त्याची प्रतिमा उथळ आहे पण सिनेमा सखोल आहे. हा फार सुंदर धक्का होता. सिनेमा सखोल असूनही कुठेही कंटाळवाणा किंवा अतिगंभीर होत नाही. 'जस्ट राईट' आहे. Mansplaining वगैरेचा कथेतला वापर बघून किती वेळा 'अगदी-अगदी' झालं विचारू नका. लेकीलाही आवडला पण माझ्यापेक्षा किंचित कमी. तिच्या मते शेवटी केन पुन्हा बार्बीपेक्षा कमी महत्त्वाचा होतो. त्यामुळे यात समानता नाही. Equality means everyone is equal, men are not beneath woman or vice versa. तिचंही पटलं मला.
---------
*Mansplaining - पुरूषांना बायकांना कुठलीही गोष्ट समजावून सांगितली की त्यांचा अहंकार सुखावतो. यात कम्प्युटरपासून कांद्यापर्यंत कुठलाही विषय असू शकतो.
*Gosling - ऐकलं की रस्ता क्रॉस करणारी Goose पक्षांची पिल्लं डोळ्यापुढे येतात.
*जनक ऐवजी जननी लिहिणार नाहीये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा