कोकोनट ट्रेल्स -२ 🥥🌴🌴
कोकोनटचे इन्स्टापेज
आमचा कोकोनट (कसाबसा)पास झाला. परिक्षेच्या दिवशी टाय व डिग्रीची हॅट घालून अभ्यास न करता गेलो होतो. सगळा भर टिपटॉप रहाण्यावर होता.
मला निळा रंग आवडतो म्हणून मी त्याचं सगळं निळ्या रंगाचं घेते. आधी काळं हार्नेस होते, एकदम रुबाबदार ऑफिसर सारखा दिसायचा. वॉकला जाताना त्याला आम्ही FBI चं वेस्ट घाला म्हणायचो. ते लहान झाल्यावर हे निळं आणलं, आता ॲस्ट्रॉनॉटचं वेस्ट घाला म्हणतो. कॉलरही निळी आहे त्यावर त्याचं नाव आणि माझा फोन नंबर कस्टम केला आहे.
मी भाजी चिरताना,इतकी उत्सुकता आहे.
मला बघत खाऊच्या आशेने स्वयंपाकघरात. मी टाचा दुखू नयेत म्हणून आणलेली मॅट त्याला वाटते त्याला आरामात बसून मला बघता यावे व खायला मागावे याच्यासाठी आणली आहे.
तपकिरी डोळ्यांचे संमोहन..!
आम्हाला कंटाळला की कोकोनट देवघरासमोर जाऊन झोपी जातो. आम्ही खूप कलकलाट केला की हे असं
आमचं बाळ ताईच्या भावलीला घाबरून पळत क्रेटमधे जाऊन बसलं. भावलीला हाताने नाचवून मी 'हॅलो कोकोनट ' म्हटलं की फारच घाबरगुंडी उडाली.
काल राखी पौर्णिमा साजरी केली तेव्हा कोकोनटलाही ओवाळलं. त्याला औक्षण करताना आधी सुपारी मग सोनं खाऊन टाकायचं होतं, गरगर मान फिरवत होता. शेवटी नारळाला नारळ बर्फीचा तुकडा मिळाला. सगळ्यांचं (जसं जमेल तसं) रक्षण करतो म्हणून त्याला बांधावी वाटली. राखी सुद्धा खाणार होता म्हणून कॉलरला बांधली.
कोकोनटला रोज सकाळी नदीकाठी गर्द जंगलातून फिरायला मजा येतेय. सगळीकडे वास घेत , हरणांना बघत , पाण्यात खेळत दोन वर्षांच्या बाळासारखं बागडतोय. घरी परत यायचं नसतं. गाडी भोवती गोलगोल फिरतो, आत उडी मारत नाही. एअरपॉडवर हलक्या आवाजात व्यंकटेश सुप्रभातम् लावून याच्यासोबत पक्ष्यांचा किलबिलाट , गर्द झाडी, जरठ वृक्षांची नदीच्या पात्रात पडलेली प्रतिबिंब, किंचित धुकं , अतिशय शांततेत रम्य नदीकाठी फिरताना अक्षरशः निर्वाणपदी जाता येते. फार वेगळी अनुभूती येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा