Red, White and Royal blue

 




Red , White and Royal blue 💙💙

गे-बाय असलेल्या दोन तरुण मुलांचा अगदी फेअरी टेल रोमॅन्स आहे. जो प्रथमच इतका सुंदररित्या चित्रीत करण्यात आला आहे. अमेरिकन लेडी प्रेसिडेंटचा मिश्रवर्णी मुलगा ॲलेक्स (Taylor Zakhar Perez) आणि ब्रिटिश ड्यूक प्रिंस हेन्री (Nicholas Galitzine) एकमेकांच्या प्रेमात पडतात व काय काय घडू शकते व काय घडू शकण्यास विघ्न येऊ शकतात याची कथा.

ट्रान्स वुमन बॉडी गार्ड, स्त्री प्रेसिडेंट(उमा थर्मन), मोनार्कीचा दबाव, अमेरिकन इलेक्शनचं प्रेशर, वेगळ्या रंगाची जवळची मैत्रीण, देशी रॉयल असिस्टंट हे सगळं एकत्र करून कथेला जास्तीत जास्त नॉर्मल केले आहे. लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक लोकांच्या आयुष्यात सेक्शुअल ओरिएंटेशन सोडलं तर ती इच्छा,आकांक्षा, स्वप्न, भावनिक जवळीक अशा सर्व बाबतीत ती अगदी इतरांसारखीच असतात हे नॅरेटिव्ह अगदी खरं असल्याने , शिवाय इतक्या प्रसन्न शैलीत मांडलेलं असल्याने खूप आवडलं. हे नॅरेटिव्ह वारंवार आलं तरच स्वीकार वाढून हे नॉर्मलाईज होणार. तेवढं वगळलं तर ख्रिसमसच्या आसपास येणाऱ्या कुठल्याही प्रिन्सेस मुव्ही सारखा आहे.

ह्यात रेशिअल, थोडीफार जेंडर न्यूट्रॅलिटी आणि सेक्शुअल डायव्हर्सिटी यांचे जवळजवळ सगळे चेकमार्क आहेत. तरीही ते अंगावर येत नाहीत किंवा उथळ वाटत नाहीत, नैसर्गिक वाटतात. सिनेमा तसा हलकाफुलकाच आहे.

अस्मिता 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता