ड्रीम गर्ल २

 <strong>ड्रीम गर्ल २ नेटफ्लिक्स</strong>



आयुष्मान खुराणा, अन्नु कपूर ,परेश रावल, अभिषेक बॅनर्जी, अनन्या पांडे, असरानी, मनोज जोशी, राजपाल यादव, सीमा पहावा, विजय राज.


जमला नाही, फार कंटाळवाणा कधीमधी सवंग व ओढून ताणून वाटतो. ड्रीम गर्ल १ उथळपणाला 'खो' देऊन परत आला होता पण धमाल होता. मला आवडला होता, आयुष्मानला मध्यमवर्गीय पात्राचा विनोद सही सही पकडता येतो. जो उच्छृंखल असला तरी चलाख असल्याने उथळ वाटत नाही. इथे ती पकड सगळ्यांचीच सुटली आहे. परेश रावल किती दिवसांनी दिसला, बरं वाटलं पण भूमिका गुळमुळीत आहे. अन्नु कपूर अतिशय उत्तम काम करतो पण इथं लक्षात रहात नाही. तसं सगळ्यांनाच अनन्या पांडे चावली असावी, त्यामुळे एवढी तगडी स्टारकास्ट असूनही सर्वांचीच कामं विस्मरणीय झालीत. आक्षेपार्ह नोंद म्हणजे अन्नु कपूरचे पात्र कर्ज फेडण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी मुलाला मुलगी करून बार गर्ल व्हायची गळ घालतो, नंतर हे प्रकरण उगाचच वाढवत नेले. बरं चीप तर चीप करकचून विनोद तरी करावेत तेही नाही, गाणी तर फारच बंडल. शेवटचं आयुष्मानचं 'प्यार तो प्यार होता है' हे सगळ्यांना दिलेलं प्रवचन तर काय होतं देव जाणे, सगळे माता का जाग्रण टाईप मान डोलावू लागले. एकता कपूरची निर्मिती असल्याने तिचा 'चीप मिडास टच' लागून बट्ट्याबोळ झालेला आहे. बघू नका/बघा.


तिचा वरदहस्त असलेल्या सिनेमांची एक कृत्रिम + उरकून टाकूया टाईप बांधणी असते. बालाजी टेलिफिल्म्स व ते 'हम पांच' पासूनच 'टडॅं टडॅं' म्युझिक आलं की कुठल्या चरख्यातून आलेलं असावं याची साधारण कल्पना येते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12th Fail (Hindi movie)

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

हृता