आत्मपॅम्फ्लेट
मला तर खूपच आवडला आत्मपॅम्फ्लेट. ते नॅरेशन जरी काही ठिकाणी लांबले असले तरी प्रेक्षक म्हणून एकदा त्याचा वेग अचूकपणे पकडला की आपण बरोबर रोलर कोस्टर सारखं खाली-वर जातो. नुकताच बघितलेला हेन्री शुगरही असाच वाटला होता. नॅरेशन वेगवान असण्याने कथानक एकाग्रता कमी असलेल्या प्रेक्षकाला धरून ठेवते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून टीमचं कौतुक वाटलं आणि जिथे मार्केट फेअर नाही तिथे कलाकृती नवीन धाटणीत सादर करणे याला हिंमत लागत असावी. माझ्यामते 'सर्वधर्मसमभाव' ह्या कन्सेप्टला कल्पकतेचा डेड एन्ड आला आहे. 'अमर अकबर ॲन्थनी' पासून- ते 'बॉम्बे'- ते मागच्या आठवड्यात आलेला विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' पर्यंत सगळे जॉन्रा+कथाप्रकार करून झालेले आहेत, तरीही हा सिनेमा मला रिफ्रेशिंग वाटला. कारण सगळ्या जातींच्या कंडिशनिंगवर वास्तववादी भाष्य करूनही सिनेमा कुठेही कडवट वा टोकदार झालेला नाही, त्याने प्रेक्षक म्हणून तो सहज स्विकारता येतो व प्रवचनाचं ओझं होत नाही. घराण्याचा मूळ पुरुष 'स्त्री' असणं हेही आवडलंय, आईबाबा, शिक्षक आवडले. मित्र तर खूपच आवडले. भावांनोने तर शेवटी धमाल ...