ॲनिमल

 





मला अजिबात आवडला नाही ॲनिमल. हिंसेच्या बाबतीत मी असहिष्णू नाही, मला 'मिर्झापूर' आवडली होती. त्यात हिंसेला त्या पात्राच्या क्रौर्याचा/ विकृतीचा किंवा प्रतिशोधाचा व्यवस्थित आधार होता. ॲनिमलमध्ये मात्र 'इतका रक्तपात दाखवू की तुम्ही भंजाळून आवडला म्हणाल' असा अप्रोच आहे. इथल्या विकृतीला कसलाच आधार नाही किंवा कसली सुसूत्रताही नाही. कसल्याच भावभावनांचे स्पष्टीकरण दिले नाही. रणबीरच्याच नाही तर अनिल कपूरच्याही नाही. काहीही कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही. कुणीकडूनही चिळकांडी उडवायला निमित्त. बंदूक असतानाही कुऱ्हाडीनं मारताना/ गळा आवळून मारताना दाखवण्याचा काय हेतू होता. एकही विनोद दर्जेदार नाही, थोडंही हसू येत नाही. चीप तर आहेतच पण 'आऊट ऑफ प्लेस'ही आहेत. घरातील शेकडो लोकांसमोर डॉक्टर 'सेक्स लाईफ' विषयी कंसल्ट करते आणि हा मूर्खासारखा तिची उलटतपासणी करतो. सत्यनारायणाची पूजा आहे की काय. गाणीही बंडल आहेत, चड्डीचे 'हस्तांतरण' करून 'मराठी पंजाबी भाई भाई' दाखवणं किती बावळटपणाचं आहे.

मला विकृतीपेक्षाही या सर्व मूर्खपणाची जास्त शिसारी आली. जरा इंटेलिजन्ट विकृती हवी होती. समोरच्याने एक वाक्य बोलले की रणबीर पन्नास वाक्य बोलतो तेही आचरट, त्यापेक्षा स्वतंत्र किळसवाणे 'टेड टॉक' ठेवा सरळ. कंटाळा आला अशा एकतर्फी कॅमाराडरीचा(?). अनिल कपूर सुद्धा कंटाळल्या सारखा वाटला या प्रकाराला. पुष्पावती फंक्शन, पॅडचे संवाद, तृप्ती दिमरी सोबत जवळीक, भावकीचे अचानक येऊन जीवावर उदार होणं, बॉबीच्या आजोबांनी मुस्लिम धर्म स्विकारणं, त्याची तीन लग्नं, सूट घालून सर्वांना गोळ्या घालत फिरणं (दहशतवादी आहेत का बिझनेसमन) , मधेच कामगारांना मोटिव्हेशनल स्पीच, ब्रा पिळण्याचा सीन, 'रश्मिकाच्या बाळंतपणात रणबीर केला त्याग'- गोष्ट काहीच्या काही आहे.

पिनोकिओ वाटावा असा डुप्लीकेट अनिल कपूर तर कळस..... इथे ओरिजनल इतका त्रयस्थ वागत असताना डुप्लिकेट फक्त ऑकवर्डच वाटत होता. ओरिजनल मेला असता तरी काहीही वाईट वाटलं नसतं असा बिल्ड अप होता. शेवटी तर उलटीवरून तृप्ती पोटुशी आहे हे ओळखणं हे तर हाईट आहे. स्त्रियांविषयीचे संवाद तर ओढूनताणून आणि जाणूनबुजून डिमीनिंग वाटले.

https://www.maayboli.com/node/84513?page=11

----

हिंसक करमणूक म्हणून जरी बघायचा असेल तर थोडातरी 'क्लेव्हर' नको का? पाच मिनिटे ह्यांचे प्रमोशन बघितले तर बॉबी सर्वांपेक्षा हॉट कसा दिसतोय हे रणबीर व अनिल कपूर म्हणत होते. 'मी कुठं हॉट- हाच खरा हॉट' खेळत होते. कुणी कितीही हॉट दिसलं तरी काय मांडे भाजायचे आहेत का ? आजकालच्या प्रथेनुसार 'अहो रूपं - अहो ध्वनी' प्रमोशन होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता