डंकी
डंकी आवडला नाही. शाहरुख आवडतो तरीही सिनेमा नाहीच आवडला. त्याच्यातल्या अढळ स्टारपदाच्या लालसेने त्याच्यातल्या अभिनेत्याला तुडवून मागे टाकले आहे. सर्व सिनेमा, अभिनय, ते गाव, पटकथा सगळं बेगडी वाटत होतं. बोमन इराणी मला ओव्हररेटेड वाटतो, रिजिड देहबोली आणि मर्यादित हावभाव दाखवणारा चेहरा आहे. सूक्ष्म ॲटिट्यूड दिसत राहतो. पण इथे सगळे त्याच लेव्हलला उतरले आहेत. तापसी त्यातल्या त्यात प्रयत्न करत होती. सपोर्टिंग स्टाफ मोठ्या स्क्रीनवर काम मिळाले याच समाधानात 'ओव्हर' करत होता. शाहरुख अगदी भावनिक क्षणी सुद्धा उत्तेजीत वाटत होता, म्हणजे भांगड्याची एनर्जी दुःखद क्षणी दाखवत होता. त्याचे खांदे, हात ,पाय, चेहरा सगळं भांगड्याच्या तयारीत वाटलं. त्याने गमावलेला अभिनय एनर्जीने भरून काढायचा प्रयत्न केला आहे पण तेच नको होतं.
अभिनयाची रेंज पूर्वीसारखी राहिली नाही फक्त हाईट आहे. आताच्या बेगडीपणात तो मोल्ड करतोय स्वतःला, जी त्याची USP नाही. सनबर्न झालेल्या स्किनवर डिस्टेंपर फासल्यासारखा दिसतोय ते वेगळंच. फारच फेक वाटला सिनेमा, वाईट एवढ्यासाठी वाटतं की त्यांनी खरं वाटावं असे प्रयत्न केलेत असं सुद्धा वाटत नाही. आऊटडेटेड वाटला सिनेमा. कशाकशाविषयीच आस्था नसणाऱ्या लोकांची कलाकृती पोचत नाही. Failed to deliver...!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा