९६

 96 बघितला. प्राईमवर सबटायटल्स सहित. (कदाचित स्पॉयलर्स असतील )



https://www.maayboli.com/node/84513?page=5

दोघांनी अतिशय सुंदर काम केले आहे. शाळकरी प्रेमपटांचा कंटाळा आला आहे पण ह्यांनी तो भाग फार ताणला नाही. एका रात्री पुरती सिंगापूरहून ती रियुनियनसाठी आलेली असते व बरेचसे मळभ दूर होऊन क्लोजर मिळवून परत जाते. सेथुपती जबरदस्त काम करतो, तृषाही तोडीसतोड.


त्यानं हे शाळेतलं प्रेम अगदी हृदयातील अत्तराच्या कुपीसारखं जपून ठेवलं आहे. स्त्री म्हणून त्यागाचं व जे मिळेल त्यात सुख मानण्याचं ट्रेनिंग असल्याने ती थोडीफार 'मुव्ह ऑन' झाली आहे पण हा नाही. त्याला तिच्याबद्दल इतकं प्रेम आणि आदर

 वाटतो की तो तिच्या आसपास प्रचंड ऑकवर्ड- निःशब्द होतो, तिला ही फजिती बघायची कधी मजा- कधी राग येतो. एक संपूर्ण रात्र एकांत मिळून अजूनही इतकं आकर्षण असून हे गप्पाच मारत बसतात. तिचा ओझरता स्पर्श झाला तरी हा शॉक लागल्यासारखं करतो. प्रेक्षकांना 'अरे, असू दे लग्न झाले असले तरी, एवढे आकर्षण आहे तर करा नं किस' असे होते, पण नाही. सेथुपती म्हणजे मर्यादापुरुषोत्तम..! तृषा हवं तेव्हा सात्विक- हवं तेव्हा मादक(PS) दिसू शकते. तेच समॅंथा 'ऊं अंटावा' मधे मादक आणि 'शाकुंतलम्' मधे बावळट दिसली.


खूप संयत -तरल प्रेमकथा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता