दो पैसे की धूप चाराने की बारीश

 पैसे की धूप चाराने की बारीश



नेटफ्लिक्स
दिग्दर्शक -दीप्ती नवल
मनिषा कोईराला, रजित कपूर (तो कॅरिस्मॅटिक रजत कपूर नाही, व्योमकेश बक्शी मधला साधासरळ)

अतिशय सुंदर चित्रपट आहे. जगावेगळ्या कथानकाला जाणून घ्यायची आवड असेल तर नक्की बघा. मला फारच आवडला. दीप्ती विदुषीच वाटत आली आहे कायम. मला तिनी काहीही केलं तरी आवडतंच. चित्रपटसृष्टीत बस्तान बसवण्यासाठी संघर्ष करणारा एक मनस्वी गीतकार, जो समलिंगी आहे. त्यामुळे एक वेगळा वैयक्तिक संघर्षही तो समांतरपणे करत आहे. मनिषाच्या नवऱ्याने मूल अपंग आहे, हे लक्षात आल्यावर जबाबदारी झटकून काढता पाय घेतला आहे. तिला उत्पन्नाचा कुठलाही मार्ग उरला नसल्याने ती वेश्याव्यवसाय करते आहे. पण मूल अपंग आणि हिचेही वय वाढत चालले आहे. त्याचा परिणाम म्हणून तिचे उत्पन्न कमी होते आहे. हे दोघेही आपापल्या आयुष्यात दिशाहीन आहेत. योगायोगाने ह्यांची भेट होते व नाईलाजाने एकत्र रहायला लागतात, कारण तो गे असल्याने त्याला घर भाड्याने मिळणं कठीण होतं आणि परिस्थितीही विशेष नाही. मग तो तिच्या अपंग मुलाला सांभाळायला लागतो. त्याला खाऊपिऊ घालतो अगदी मजेदार मावशी सारखी माया करतो. त्यांचं नातं सुरेख बहरत जातं. आईची ओढाताण आणि मुलाची तगमगही थांबते. फार निरागस आणि निर्व्याज नातं होतं तिघांमधेही.

ती तिच्या अडाणीपणामुळे त्याला 'बरं' करायचे प्रयत्न करते. नंतर सहजपणे स्विकारतेही. भावभावनांचे आविष्कार आणि गाण्यांच्या ओळीही सुरेख आहेत. झगमगाट काहीच नाही, उलट मळकट आहे. पण काही तरी छान बघितल्याचे समाधान मिळाले.

https://www.maayboli.com/node/84513?page=14

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोड तो आए छांव ना आए - अर्थात Midlife मधली मनाची तगमग

12th Fail (Hindi movie)

हृता