पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साईड इफेक्ट्स

इमेज
  "साईड इफेक्ट्स' बघितला.  ज्यूड लॉ, रूनी मारा, कॅथरीन झिटा जोन्स, चॅनिंग टेटम सायकॉलॉजीकल थ्रिलर चित्रपट आहे. रूनी मारा व चॅनिंग टेटम नवरा बायको आहेत. तो ट्रेडिंग मधे मोठ्या चुका करून चार वर्षांसाठी तुरुंगात जाऊन आला आहे. रूनीला नैराश्याने घेरलेले असल्याने ती भीतींवर कार नेऊन धडकवते व आत्महत्येचा प्रयत्न करते. तेथून सायकॉलॉजीस्ट ज्यूड लॉकडे तिचे उपचार सुरू होतात. वेगवेगळ्या औषधांचे सगळे उपाय थकल्यावर ते क्लिनिकल ट्रायल मधे नुकतेच सुरू असलेले औषध तिच्या जुन्या थेरपिस्ट - कॅथरीन झिटा जोन्सच्या मदतीने सुरू करतात. त्याच्या साईड इफेक्ट्सने झोपेत चालायला लागून रूनी शिमला मिरची चिरताचिरता नवऱ्यालाच चिरून टाकते व सरळ झोपायला निघून जाते.  तेथून गुंतागुंतीची कथा सुरू होते व कथा वेगही धरते. ज्यूडचे मानमरातब जाऊन सगळीकडे वेगळाच रंग या केसला धरायला लागतो. कारण त्याने केलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या प्रयोगाला ही बळी पडली आहे अशा वदंता/ वावड्या मिडीयात सुरू होतात. तिला मनोरुग्ण असल्याने शिक्षेतून सूट मिळणार असते व सगळा दोष चुकीच्या औषधाचा व साईड इफेक्ट्स चा असल्याने तिला काही दिवस मेंटल हॉ...

प्रूफ

इमेज
  प्रूफ (2005) (Anthony Hopkins, Gwyneth Paltro, Jake Gyllenhaal, Hope Davis) एका अतिबुद्धिमान गणितज्ञ व त्याच्या मुलीची गोष्ट आहे. दोघेही रूढार्थाने विचित्र, विक्षिप्त व लहरी वाटावेत अशा व्यक्तिरेखा. ॲन्थनी व ग्वेनेथने अप्रतिम काम केले आहे. तो शिकागो विद्यापीठात शिकवत असतो, तीही तेथेच शिकत असते. पण मानसिक आजाराने तो हळूहळू पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होत जातो, ज्याची जाणीव त्याला नसते. घरी बसून वह्याच्या वह्या गणितीय सिद्धता व सूत्रांनी भरवून टाकत असतो. काळवेळ खाणंपिणं ह्याचेही भान त्याला उरत नाही. त्यात मानसिक आजार कुठला हे नक्की सांगितले नाही पण लक्षणं स्किझोफ्रेनिया सारखी वाटली. ती त्याचीच काळजी घेत बसते व तिच्याही स्वास्थ्यावर, अभ्यासावर व हळूहळू आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो. काही वर्षं दोघांनाही एकमेकांशिवाय कुणी उरत नाही.‌ कारण वेडसर बाबांची काळजी घेणारी तिरसट, अब्सेंट माईन्डेड मुलगी असे इक्वेशन होऊन जाते. बाबांच्या फ्युनरलला गर्दी बघून ती सर्वांना म्हणते, "मला तर माहितीही नव्हते की त्यांना एवढी मित्रमंडळी आहे कारण गेली पाच वर्षे ते आजारी असताना तुमच्यापैकी कुणालाही त्यांना...