साईड इफेक्ट्स
"साईड इफेक्ट्स' बघितला.
ज्यूड लॉ, रूनी मारा, कॅथरीन झिटा जोन्स, चॅनिंग टेटम
सायकॉलॉजीकल थ्रिलर चित्रपट आहे. रूनी मारा व चॅनिंग टेटम नवरा बायको आहेत. तो ट्रेडिंग मधे मोठ्या चुका करून चार वर्षांसाठी तुरुंगात जाऊन आला आहे. रूनीला नैराश्याने घेरलेले असल्याने ती भीतींवर कार नेऊन धडकवते व आत्महत्येचा प्रयत्न करते. तेथून सायकॉलॉजीस्ट ज्यूड लॉकडे तिचे उपचार सुरू होतात. वेगवेगळ्या औषधांचे सगळे उपाय थकल्यावर ते क्लिनिकल ट्रायल मधे नुकतेच सुरू असलेले औषध तिच्या जुन्या थेरपिस्ट - कॅथरीन झिटा जोन्सच्या मदतीने सुरू करतात. त्याच्या साईड इफेक्ट्सने झोपेत चालायला लागून रूनी शिमला मिरची चिरताचिरता नवऱ्यालाच चिरून टाकते व सरळ झोपायला निघून जाते.
तेथून गुंतागुंतीची कथा सुरू होते व कथा वेगही धरते. ज्यूडचे मानमरातब जाऊन सगळीकडे वेगळाच रंग या केसला धरायला लागतो. कारण त्याने केलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या प्रयोगाला ही बळी पडली आहे अशा वदंता/ वावड्या मिडीयात सुरू होतात. तिला मनोरुग्ण असल्याने शिक्षेतून सूट मिळणार असते व सगळा दोष चुकीच्या औषधाचा व साईड इफेक्ट्स चा असल्याने तिला काही दिवस मेंटल हॉस्पिटलमध्ये राहून घरी सोडवण्याची तरतूद करण्यात येते. ज्यूड मात्र पूर्णपणे अडकून जातो, त्याची प्रॅक्टिस बुडण्याची वेळ येते. तेव्हा काही हिंट्स मिळत जातात व ही मनोरुग्ण नसून कॅथरीन व हिचे प्रेमप्रकरण असून दोघींनी मिळून ह्याला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो. हा खून त्या दोघींचा कट असतो. ते तो रूनीकडून सिद्ध करवून घेतो व दोघींनाही शिक्षा होते. "डबल जेपर्डी" मुळे रूनीला पुन्हा शिक्षा होऊ शकत नसते पण एक वेगळीच खेळी खेळून तिला मनोरुग्णालयात अडकवून टाकण्यात ज्यूड यशस्वी होता. अशा रितीने दोघींनाही आपल्या दुष्कृत्यांची शिक्षा होते. शेवट अगदी आटपाट नगरातील गोष्टीसारखा सुखांत आहे.
चित्रपट इंट्रेस्टींग आहे पण मला खूप काही आवडला नाही. अस्पष्ट संवाद फेक वाटत होती. ज्यूडचे काम सर्वात जास्त आवडले, रूनीचेही चांगले आहे. मला थोडा कंटाळवाणा वाटला. काही भाग कळला नाही, सुरवातीला एंगेजिंग वाटला नाही. कथेला पकड घ्यायला पाऊण तास लागला आणि सिनेमा पावणेदोन तासांचा आहे. एकंदरीत बघणेबल कॅटॅगरी वाटला. सायकॉलॉजीकल थ्रिलर हा जॉन्रा आवडणाऱ्यांना कदाचित जास्त आवडेल.
-------------
यावरून 'पेन हसलर्स' आठवला. तो यापेक्षा जास्त चांगला होता. पेन मेडिकेशन, इन्शुरन्स, प्रिस्क्रिप्शनच्या काळ्या धंद्यावर आहे. तो रेको देईन. एमिली ब्लंट जबरदस्त काम करते. हा थ्रिलर नाही, नेटफ्लिक्सवर आहे. हल्लीच युनायटेड हेल्थ केअरच्या सीईओचा मॅनहॅटनमधे दिवसाढवळ्या खून झाला. त्याचाही ह्या इन्शुरन्सच्या गोरखधंद्यासोबत व पेन मेडिकेशनच्या आहारी जाण्यासोबत मोठा संबंध आहे व तो कसाकसा आहे ह्याची थोडीफार कल्पना येते. अमेरिकेत राहणाऱ्यांना जास्त चांगला समजेल.
https://www.maayboli.com/node/86233?page=2#google_vignette
*डबल जेपर्डी - अमेरिकेतील संविधानातील कायद्याच्या पाचव्या अमेंडमेंट नुसार एकाच माणसाला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ शकत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा