पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इरादा

इमेज
  काल इरादा (Irada) नावाचा सुंदर चित्रपट पाहिला. यूट्यूब वर Iraada नावाचा शत्रुघ्न सिन्हाचा एक सिनेमा आहे , तो हा नाही. यात नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी, दिव्या दत्ता आणि शरद केळकर, सागरिका घाटगे आहेत. सर्वांची कामं फारच भारी झालेली आहेत. पर्फॉर्मन्ससाठी पहावेत असे सिनेमे हल्ली निघत नाहीत, हाही २०१७ चा आहे. खऱ्या घटनेवर बेतलेली कथा आहे. भटिंडा येथील थर्मल- पावर प्लॅन्ट मुळे तेथील कनाल, नदी यात सोडल्याजाणाऱ्या कार्सिनोजेनिक केमिकल्स मुळे प्रत्येक घरात कॅन्सरचे रुग्ण सापडायचे. यावर काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये छापून आले होते. युरेनियमने होणारी विषबाधा, रिव्हर्स बोअरिंग, फर्टिलायझर मधून होणारी विषबाधा - या सगळ्यामुळे होणारे "इको - टेरेरिझम" यावर कथानक बेतलेय. थ्रिलर सिनेमा आहे. नसिरुद्दीन शाह एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे, मुलीला सुद्धा एअरफोर्स मधे पायलट करायचं स्वप्न आहे. त्यासाठी तिला रोज कॅनालमधे पोहण्याच्या सरावासाठी घेऊन जातो जेथे हे केमिकल्स सोडलेले असतात. ते पाणी नाकातोंडात जाऊन ती तडकाफडकी कॅन्सरने मरून जाते. तेथूनच सगळा प्रतिशोध सुरू होतो. शरद केळकर या थर्मल प्लान्टचा मालक...

आप जैसा कोई

इमेज
  आप जैसा कोई (नेटफ्लिक्सवर) माधवन, फातिमा सना शेख, नमित दास, आयेशा रजा, मनिष चौधरी हा नावावरून क्रिंज आणि ट्रेलरवरून फार काही खास किंवा नाविन्यपूर्ण नसलेला वाटला होता. सहज 'वर्क आऊट' करताना लावला आणि याने खिळवून ठेवले. संपूर्ण पाहूनच उठले. 'आप जैसा कोई' ऐवजी 'आज जाने की जिद ना करो' नाव ह्यातल्या रोमॅन्ससाठी चपखल ठरले असते.‌ इतका vintage आणि हुरहूर लावणारा आहे. माधवन(श्रीरेणू त्रिपाठी) एक ४२ वर्षे वय असलेला संस्कृतचा शिक्षक आहे. लग्न जमत नाहीये, कुणालाच तो इंटरेस्टिंग वाटत नाही. फातिमा (मधू बोस) एक ३२ वर्षांची फ्रेंचची शिक्षिका आहे. नमित दास मित्राच्या भूमिकेत आहे, फार भारी काम करतो आणि अंडररेटेड वाटतो. आयेशा रजा एकदम गृहकृत्यदक्ष, आई एवढा जीव लावणारी मायाळू वहिनी व मनिष चौधरी इतरांना ताब्यात घेणारा एकदम पुरूषसत्ताक विचारांचा मोठा भाऊ आहे. मधू बोसचे कुटुंब एकदम प्रेमळ आधुनिक विचारांचे कलकत्त्यातील टिपिकल बंगाली कुटुंब आहे. माधवनचे कुटुंब आगरतळा व जमशेदपूरचे दाखवले आहे. मुंबई, दिल्ली, पंजाब, युपीही न दाखविल्याबद्दल टिमचे कौतुक. श्री प्रचंड एकलकोंडा, लाजाळू व इंट्...