कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण शरदपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी नारायणी परत जाणार आहे हे सख्यांना कळाल्यावर त्यांनी शरदपौर्णिमा नित्यापेक्षा अधिकच उत्साहाने साजरी करायचे ठरवले. त्यासाठी सर्वच सख्या स्वतःकडील सर्वात सुंदर वस्त्र व अलंकार नारायणीने परिधान करावा असा आग्रह देखील करू लागल्या. त्यांचे ते निष्पाप, निर्व्याज प्रेम पाहून नारायणीला गहिवरून आले. तिच्याकडे असलेल्या वस्त्रालंकारात ती संतुष्ट आहे हे त्यांना पटवून द्यायला तिला बरेच प्रयास करावे लागले. पुढचे दोन सप्ताहांत गुणवंती मावशीने तिला एकाही कामाला हात लावू दिला नाही. उलट गोडाधोडाचे भरवून खूप लाड पुरवले. याच काळात तिने तातांनी पाठवलेल्या वस्त्रांपैकी एक श्वेतशुभ्र वस्त्र निवडून त्याचा घागरा सीवन केला.दीपगौरिकेच्या आग्रहाप्रमाने त्याला चंदेरी-रजत रंगाचे काठही शिवले. शरदपौर्णिमेच्या रासाच्या कार्यक्रमात ह्या वस्त्रामुळे ती पौर्णिमेच्या चंद्रमासम लखलखणार होती. ह्या रासाच्या कार्यक्रमाला सर्वच लहानथोर वृन्दावनवासीला आमंत्रण होते. तशी शरदपौर्णिमेची परंपराच होती वृन्दावनात. नारायणी सुद्धा त्यांच्या इतक्याच उत्साहाने त्यात सहभ...